एक्स्प्लोर

IPO : गुंतवणुकीची आणखी एक संधी; मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा आयपीओ बाजारात

IPO : गुजरातमधील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 49 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 25 एप्रिल पर्यंत गुंतवणूक करू शकतील.

IPO : आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ग्लोबल लाँगलाइफ हॉस्पिटल अँड रिसर्चचा आयपीओ उद्या म्हणजे 21 एप्रिलला उघडणार आहे. गुजरातमधील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 49 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 25 एप्रिल पर्यंत गुंतवणूक करू शकतील.

या इश्यूसाठी 140 रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि गुंतवणूकदार किमान 1000 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, म्हणजेच ते किमान 1.40 लाख रुपयांची बोली लावू शकतील. आयपीओच्या यशानंतर, शेअर्स सूचीबद्ध केले जातील आणि प्रवर्तकांची होल्डिंग 81.43% वरून 54.29% पर्यंत खाली येईल.

आयपीओबद्दल सर्व तपशील

  • 49 कोटी रुपयांचा हा आयपीओ 21 ते 25 एप्रिल दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
  • या इश्यू अंतर्गत, 10 रुपये दर्शनी मूल्याचे 35 लाख नवीन इक्विटी शेअर जारी केले जातील.
  • याची किंमत 140 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे
  • गुंतवणूकदार किमान 1000 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, म्हणजेच ते किमान 1.40 लाख रुपयांची बोली लावू शकतील.
  • इश्यूचा बोली आकार 33.24 लाख शेअर्स आहे.
  • इश्यूच्या 50 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 50 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
  • आयपीओच्या यशानंतर, शेअर्स BSE SME वर सूचीबद्ध केले जातील.
  •  इश्यूद्वारे जमा होणारा पैसा भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी याचा वापर होईल

कंपनीबद्दल  ..

ग्लोबल लाँगलाइफ अँड रिसर्च लिमिटेड ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगात), नेत्र, हृदयरोग (हृदय), त्वचाविज्ञान (त्वचा), स्त्रीरोगतज्ञ (महिला), मणक्याची शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, अल्ट्रासाऊंड, मायक्रोबायोलॉजी, डायलिसिस आणि मानसोपचार यासह इतर आरोग्य सेवा प्रदान करते. कंपनीच्या आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाल्यास, 2018-19 या आर्थिक वर्षात त्यांचा निव्वळ नफा (करानंतरचा नफा) 136.47 लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये (-)86.24 लाख रुपये नकारात्मक क्षेत्रात आला. याचा अर्थ 2019-20 या आर्थिक वर्षात 86.24 लाख रुपयांचा तोटा झाला. पण पुढील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये परिस्थिती सुधारली आणि 103.54 लाख रुपयांचा नफा झाला. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्लोबल लाँगलाइफ हॉस्पिटल अँड रिसर्चने 386.31 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget