एक्स्प्लोर

समर्पण मैती - मिस्टर गे इंडिया 2018!

'मिस्टर गे इंडिया' बनल्यानंतर आता समर्पण मे महिन्यात 'मिस्टर गे वर्ल्ड' पीजंटमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.

मुंबई : 13 जानेवारी, 2018 ह्या तारखेचं समर्पण मैतीच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. 29 वर्षीय समर्पण याच दिवशी 'मिस्टर गे इंडिया' बनला होता. होय, 'मिस्टर गे इंडिया'. मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सबाबत तुम्हाला माहितच असेल. 'मिस्टर गे इंडिया'ही अशीच एक स्पर्धा किंवा टायटल आहे. नावावरुनच स्पष्ट आहे की, यातील स्पर्धक गे अर्थात समलैंगिक आहेत. सार्वजनिकरित्या ते आपली ओळख 'गे' म्हणून सांगतात. 2009 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. यंदा समर्पण मैती हा या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. एलजीबीटी समाजाचे प्रसिद्ध चेहरे आणि कलाकारांनी गच्च भरलेल्या ऑडिटोरियममध्ये समर्पणच्या नावाची घोषणा होताच, टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज घुमला. 'मिस्टर गे इंडिया' बनल्यानंतर आता समर्पण मे महिन्यात 'मिस्टर गे वर्ल्ड' पीजंटमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. कोण आहे समर्पण मैती? Samarpan_2 पश्चिम बंगालच्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या समर्पणसाठी हे टायटल जिंकणं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. समर्पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बॉयोलॉजीमध्ये रिसर्च करत आहे. काही वर्षांपूर्वी तो स्वत:ची ओळख नाकारत होता. लोकांचे टोमणे आणि कुटुंबाला समजावण्याच्या अपयशी प्रयत्नांशी लढत होता. काही काळापूर्वी तो स्वत: त्रास देत होता. इतकंच नाही तर आयुष्य संपवण्यापर्यंत तो पोहोचला होता. पण आता सगळं बदललं आहे. आता शुभेच्छांचे मेसेज आणि कॉल्सना उत्तर देत आहे, मुलाखती देत आहे. "सुरुवातीचा काळ अतिशय अडचणींचा किंवा कठीण असला तरी शेवटी सगळं व्यवस्थितच होतं," असं समर्पण म्हणतो. 'ग्रॅज्युएशनमध्ये मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. तिथे मी स्वत:वर विश्वास ठेवून सेक्शुअॅलिटीबाबत सांगितलं. त्यानंतर माझं तिथे राहणं कठीण झालं. परिस्थिती अशी बनली की समर्पणला हॉस्टेल सोडावं लागलं. "माझ्या रुममेटसोबत माझी चांगली मैत्री होती. पण काहींनी अफवा पसरवली की आम्ही दोघे कपल आहोत, जे सत्य नव्हतं. रुममेटपासून वेगळं हो किंवा हॉस्टेल सोड, असं मला सांगण्यात आलं." अखेर समर्पणने हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला. समर्पणची तक्रार Samarpan_1 एलजीबीटी समाज अतिशय 'अर्बन सेंट्रिक' आहे. "कम्युनिटीमधील बहुतांश लोक मोठ्या शहरांमधील आहे. ते सफाईदारपणे इंग्लिश बोलतात आणि महागड्या ठिकाणी मीटिंग करतात. जर एखादा गे व्यक्ती गाव किंवा मागासलेल्या भागातील असेल तर त्याला अॅडजस्ट करणं फारच कठीण असतं," अशी समर्पणची तक्रार आहे. समर्पणलाही अशा भेदभावाचा सामना करावा लागला होता. "कोलकात्यामध्ये आल्यानंतर लोकांनी माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण हळूहळू मी माझी ओळख निर्माण केली," असं त्याने सांगितलं. समर्पणला लिहिण्याचा आणि मॉडेलिंगचा छंद आहे. "जेव्हा लोकांनी माझं लिखाण वाचलं, माझी मॉडेलिंग पाहिली, माझा आत्मविश्वास पाहिल्यानंतर ते माझ्याकडे आले," असंही समर्पण म्हणाला. स्पर्धेत खास काय? मिस्टर गे सारख्या स्पर्धा खास लूक आणि सौंदर्याच्या बळावर जिंकली जाते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असं काहीही नसल्याचं मिस्टर गे वर्ल्डचे संचालक (दक्षिण-पूर्व आशिया) सुशांत दिवगीकर यांनी सांगितलं. "ही स्पर्धा मिस इंडिया आणि मिस वर्ल्डपेक्षा वेगळी आहे. मिस्टर गे बनण्यासाठी तुम्ही उंच, गोरं, सुंदर किंवा अविवाहित असण्याची आवश्यकता नाही.  एलजीबीटी समाज आधीच अनेक भेदभावांचा सामना करतो. जर आम्ही पण असंच केलं, तर लोक आमच्यावर हसतील. जर तुम्ही याआधीचे मिस्टर गे पाहिले तर ते एकमेकांपेक्षा अगदी वेगळे असल्याचं दिसेल. "मागच्या वर्षाचा विजेता अन्वेश साहू आणि समर्पण यांनाच पाहा, दोघे वेगवेगळे आहेत. अन्वेश सावळा आणि सडपातळ आहे. तर समर्पण गोरा आणि मजबूत शरीरयष्टीचा आहे." मिस्टर गे कसं बनतात? Samarpan_4 मिस्टर गे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन अटी आहेत. • 18 वर्षांवरील कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. • तो भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. • ते गे असावा आणि सार्वजनिक आयुष्यात आपली ओळख सहजरित्या सांगेल असा हवा. "नोंदणीनंतर अनेक फेऱ्या होतात. उदाहरणार्थ, मिस्टर फोटोजेनिक राऊंड आणि पीपल्स चॉईस राऊड. स्पर्धेकांना मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी व्हावं लागतं," असं सुशांत यांनी सांगितलं. या फेऱ्यांनंतर मिस्टर गेच्या नावाची घोषणा केली जाते. त्याला 'मिस्टर गे वर्ल्ड' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं जातं. या स्पर्धेचा उद्देश काय? सुशांत यांनी सांगितलं की, "अशा स्पर्धांमुळे एलजीबीटी समुदायाच्या लोकांना गाठीभेटीची संधी मिळते. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो, जिथे ते आपलं मत मांडू शकतात." "भारतासारख्या देशात अशा स्पर्धांची आणखी आवश्यकता आहे. कारण बहुतांश लोकांना गे किंवा लेस्बियन असतात हेच माहित नसतं. ज्यांना माहित आहे, ते त्यांना चुकीचं समजतात. स्पर्धा जिंकल्यानंतर आता काय? समर्पणला गावांमध्ये काम करायचं आहे. फक्त एलजीबीटींच्या मुद्द्यावरच नाही तर आरोग्य विषयक अडचणींवरही काम करायचं आहे. त्याला फिल्म मेकिंगची आवड आहे. या क्षेत्रातही काम करण्याची त्याची इच्छा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Embed widget