एक्स्प्लोर

Mann Ki Baat : स्टार्टअपमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! 'युनिकॉर्न'ची संख्या 100वर; पंतप्रधानांकडून कौतुक

PM Modi Live Mann Ki Baat:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं.

PM Modi Live Mann Ki Baat:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतानं स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की,  काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने एक अशी कामगिरी केली आहे, जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारताने एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावले, ते खूपच विशेष आहे. या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त
पंतप्रधान म्हणाले की, एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यांत आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे.येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत, असं पंतप्रधान म्हणाले.  

भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्टअप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते.मित्रहो, देशाच्या या यशासाठी देशाची युवाशक्ती, देशातील प्रतिभा आणि देशाचे सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत, यात प्रत्येकाचे योगदान आहे, असं ते म्हणाले. 

पंतप्रधान म्हणाले की,  आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, स्टार्ट-अप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्वाचे आहे. एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत, ज्यांनी वाढत्या स्टार्ट-अप्ससाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
Embed widget