एक्स्प्लोर
उर्जित पटेल यांच्या मदतीला मनमोहन सिंह धावले!
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज स्थायी संसदीय समितीच्या बैठकीत नोटाबंदीविषयी आपली बाजू मांडली. मात्र खासदारांच्या अनेक प्रश्नांचं त्यांना समाधानकारक उत्तरं देता आलं नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
यावेळी उर्जित पटेल यांच्या मदतीला माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री मनमोहन सिंह धावून आले. काँग्रेस खासदाराने एक प्रश्न विचारला. मात्र आवश्यक त्या प्रश्नांचीच उत्तर द्या, असं सांगत मनमोहन सिंह यांनी उर्जित पटेल यांची मदत केली. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.
पैसे काढण्यावरील मर्यादा हटवली तर चलनकल्लोळ कमी नाही होणार का, असा सवाल काँग्रेस खासदाराने विचारला होता. मात्र मनमोहन सिंह यांनी आवश्यक त्याच प्रश्नांची उत्तरं द्या, असं उर्जित पटेल यांना सांगितलं.
उर्जित पटेल यांना स्थायी समितीच्या सदस्यांच्या काही अवघड प्रश्नांचा सामना करावा लागला. नोटाबंदीनंतर किती जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या, या प्रश्नाचंही नेमकं उत्तर उर्जित पटेल यांना देता आलं नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
स्थायी समितीमध्ये अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. समितीच्या या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं प्रलंबित राहिल्यामुळे पुन्हा एकदा बैठक बोलावण्याचा निर्णय करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement