एक्स्प्लोर
Advertisement
मेनका गांधींकडून पहिल्यांदाच जाऊबाई सोनिया गांधीची स्तुती
लखनौ : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या जाऊबाई म्हणजेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची स्तुती केली आहे. पिलीभीत जिल्ह्यातील दक्षता समितीच्या बैठकीत मेनका गांधींनी जिल्हा दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांना सोनियांचं उदाहरण देत किस्सा सांगितला.
पिलीभीतमध्ये शनिवारी मेनका गांधी जिल्हा दक्षता समितीच्या कार्यक्रमाला संबोधलं. त्यावेळी भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असं एक आधिकारी म्हणाला. यावर मेनका गांधींनी सोनिया गांधीचं उदाहरण दिलं.
मेनका गांधी म्हणाल्या की, “नावाचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीला सोनिया गांधींनी चांगली अद्दल घडवली. सोनियांच्या एका नातेवाईकाने दुकान उघडलं होतं. मात्र त्याने सोनियांच्या नावाचा वापर करुन लोकांना आपल्या दुकानातूनच सामान घ्या, असं सांगितलं. आपल्या नावाचा चुकीचा वापर होत असल्याचं सोनियांना कळताच त्यांनी वर्तमानपत्रात जाहीरपणे सांगितलं की, त्या व्यक्तीच्या दुकानावर कोणीही जाऊ नका.”
हा मुद्दा का उपस्थित झाला?
शाळेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचारबाबत बोलताना हा मुद्दा उपस्थित झाला. काही शाळांमध्ये ज्युनिअर क्लासेस घेण्याची परवानगी असतानाही, तिथे सीनिअर स्तराचे क्लास घेतले जातात.
या क्लासेसना परवानगी देणाऱ्या सरकारी बाबुंविरोधात तुम्ही कोणती कारवाई करत आहात, असा प्रश्न मेनका गांधींनी आधिकाऱ्यांना विचारला. त्यावर भ्रष्टाचारी बाबुंविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं.
यानंतर मेनका गांधींनी अधिकाऱ्यांना सोनिया गांधींचं उदाहरण देत तुम्हीही त्यांच्यासारखं काम करण्याचा सल्ला दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement