एक्स्प्लोर
Kashmir Terror Attack : जम्मूमधल्या नौशेरामध्ये आयईडीचा स्फोट, मेजर शहीद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला असला तरी अद्याप दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी भारतीय जवानांवर हल्ला केला, या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अजून एक दहशतवादी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीमधील नौशेरा येथे दहशतवाद्यांनी आयईडीचा (IED: Improvised explosive device) स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक मेजर रॅन्क असलेला अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीसुद्धा अद्याप दहशतवादी कारवाया सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट केला. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.
VIDEO | पुलवाम्यातील भ्याड हल्ल्यावर काय वाटतं काश्मीर खोऱ्याला? | ग्राऊंड रिपोर्ट | काश्मीर | एबीपी माझा
दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर आयईडी ठेवला होता. याची माहिती जवानांना मिळाली. जवानांकडून आयईडी निकामी करण्याचे काम सुरु असताना त्याचा स्फोट झाला.
VIDEO | पुलवाम्यातील हल्ल्यानंतर कसं आहे काश्मीरचं खोरं? | ग्राऊंड रिपोर्ट | काश्मीर | एबीपी माझा संबधित बातम्या : Pulwama terror attack : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार 5 लाख रुपये Pulwama terror attack : दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जबाबदार : आझम खान Pulwama terror attack : भारताचे जवान गुन्हेगारांना शिक्षा देतील, थोडं थांबा : नरेंद्र मोदीThe Major-rank army officer was killed while defusing an Improvised Explosive Device (IED) which had been planted by terrorists. The officer is from the Corps of Engineers. The IED was planted 1.5 kms inside the Line of Control in the Naushera sector, Rajouri district, in J&K https://t.co/ZyWFS9RbWR
— ANI (@ANI) February 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement