एक्स्प्लोर

Odisha gang rape case : तब्बल 22 वर्षानंतर ओदिशा गँग रेप प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

ओडिशामध्ये 1999 साली घडलेल्या बलात्काराच्या घटनेने ओदिशाचे राजकारण ढवळून निघालं होतं. यानंतर मुख्यमंत्री जे.बी. पटनायक (JB patnaik ) यांना राजीनामा द्यावा लागला होता.एका वन आधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार (IFS gang rape case) करणारा मुख्य आरोपी गेली 22 वर्षे फरार होता.

भूवनेश्वर: तब्बल 22 वर्षापूर्वी ओदिशामध्ये एका आयएफएस अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यातील मुख्य आरोपी विवेकानंद बिस्वाल याला ओदिशा पोलिसांनी महाराष्ट्रातील नवी मुंबई परिसरात अटक केली आहे. गेली 22 वर्षे ओडिशा पोलीस आणि सीबीआयला या आरोपीने चकवा दिला होता.

ऑपरेशन 'सायलेन्ट व्हायपर' ओदिशा गॅंग रेप प्रकरणातील मुख्य आरोपी हा गेली 22 वर्षे फरार होता. तीन महिन्यापूर्वी ओदिशा पोलिसांना संबंधित आरोपी हा मुंबई-पुणे दरम्यानच्या अॅम्बी व्हॅलीत प्लंबर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आरोपीला पकडण्यासाठी ओदिशा पोलिसांनी ऑपरेशन सायलन्ट व्हायपर ही मोहीम राबवली.

हा आरोपी आपले मुळ नाव बदलून जालेंदर स्वैन या नावाने राहत होता. अॅम्बी व्हॅलीत एकूण 14,000 कर्मचारी काम करतात. त्यातून या आरोपीची ओळख पटवणे अवघड होतं. आपले नाव आणि पत्ता बदलल्याने तो कधीच पकडला जाणार नाही अशी खात्री होती. पण तरीही पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून आरोपीला जेरबंद केलं.

पतीने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या, ठाण्यातील इंदिरानगर भागातील धक्कादायक घटना

ओदिशातील बारंग या गावाजवळ 9 जानेवारी 1999 रोजी ही घटना घडली होती. ओदिशातील एका आयएफएस अधिकाऱ्याची पत्नी तिच्या मित्रासोबत बारंगच्या जवळ चहा घेण्यासाठी उतरले होते. त्यावेळी आरोपी बिस्वाल, धिरेद्र मोहंती आणि प्रदीप साहू या तिघांनी त्या महिलेचे अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

यातील धिरेद्र मोहंती आणि प्रदीप साहू या दोन आरोपींना 26 जानेवारी 1999 साली अटक करण्यात आली होती. पण विवेकानंद बिस्वाल हा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणाचा तपास करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन ही केस सीबीआयकडे सोपवली होती. धिरेद्र मोहंती आणि प्रदीप साहू या दोन आरोपींना खोर्दा जिल्हा न्यायालयाने 1999 साली जन्मठेपेशी शिक्षा सुनावली.

काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जे.बी. पटनायकांना आणखी एका प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. पण या गॅंग रेप प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलली नाहीत आणि पोलिसांना स्वतंत्रपणे तपास करु दिला नाही असा त्यांच्यावर आरोप होत होता. या गॅग रेप प्रकरणात जे.बी. पटनायक यांचे जवळचे सहकारी रणजीत रे यांना पीडित महिलेच्या छळवणूक प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

Mumbai Crime News : पोलिसांचा वेश परिधान करुन फसवणूक, टॅक्सी चालक बनला गुन्हेगार, सोशल मीडियावर करायचा हवा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP MajhaJayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
×
Embed widget