एक्स्प्लोर

पतीने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या, ठाण्यातील इंदिरानगर भागातील धक्कादायक घटना

कौटुंबिक वादाने प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. श्रीनगर पोलीस हे अधिक तपास करत आहेत.

मुंबई : झोपडपट्टीत अरुंद घर, मोठा परिवार त्यातच कोरोनाचा काळ, घरात सासू आणि सून यांचा वारंवार होणारा संघर्ष याला कंटाळून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात हातोड्याचे प्रहार करून हत्या केली. हत्येनंतर पश्चातापात स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या श्रीनगर वागले इस्टेट परिसरात घडली आहे. श्रीनगर पोलिसांनी या हत्या प्रकरणी मृतक आरोपी आकाश बालाजी समुखराव याच्या विरोधात भादंवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

हत्या आणि आत्महत्या अशा दुहेरी घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 17 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्या आहेत. आत्महत्या करणारा पती मृतक आकाश बालाजी समुखराव (29) यांनी आपली पत्नी अश्विनी आकाश समुखराव(19) हिची हत्या प्रथम केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. मृतक अश्विनी आणि मृतक आरोपी आकाश हे रणजित पांडुरंग शिरसाठ यांच्या इंदिरानगर येथील शिवमहिमा चाळीतील खोलीत राहत होते. वेगळे राहण्यावरून या पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती. दरम्यान या भांडणाला कंटाळलेल्या आकाश याने रागाच्या भरात हातोड्याने पत्नी अश्विनीच्या डोक्यात प्रहार केले. यात अश्विनी मृत पावली. त्यानंतर पश्चातापात मृतक आरोपी पती आकाश याने आपल्याच राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती 17 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृतक आरोपीचे वडील बालाजी यांनी श्रीनगर पोलिसांना माहिती दिली. यामुळे वागले परिसरात एकच खळबळ उडाली.

पत्नीची हत्या आणि आरोपीची आत्महत्या केल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपायुक्त परिमंडळ-5, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे इस्टेट, विभाग ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.ए. शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशासन , पोलीस निरीक्षक गुन्हे शिंदे यांनी भेट दिली. श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये मात्र मृतक आरोपी पती आकाश याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात कौटुंबिक वादाने प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. श्रीनगर पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

TET Exam : टीईटीचा पेपर आग्रा येथील छापखान्यातील कर्मचाऱ्यानं 8000 रुपयांमध्ये फोडला, बुटांच्या इनसोलमधून पेपर बाहेर, धक्कादायक माहिती समोर
टीईटीचा पेपर आग्रा येथील छापखान्यातील कर्मचाऱ्यानं 8000 रुपयांमध्ये फोडला, पुढं 80 हजारांमध्ये विक्री, धक्कादायक माहिती समोर
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले

व्हिडीओ

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget