एक्स्प्लोर
स्कूटी शिकताना अपघात, जिवलग मैत्रिणींचा मृत्यू
परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास स्कूटी देण्याचं आश्वासन दोघींच्या पालकांनी दिलं होतं. त्यामुळे दोघींनीही स्कूटी शिकायला सुरुवात केली होती.
लखनौ : लखनौ ओवरब्रिजवर स्कूटी शिकताना अपघात होऊन अल्पवयीन तरुणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्कूटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर आपटून दोन मैत्रिणींना प्राण गमवावे लागले.
16 वर्षांची अमिषा आणि 14 वर्षांची रेशू शालेय जीवनापासून जीवलग मैत्रिणी होत्या. दोघी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये कैलासनगर भागात राहायच्या. अमिषाचे वडील अशोक पांडे प्रॉपर्टी डीलरचं काम करतात, तर तिची आई मंजू गृहिणी आहे. रेशूचे वडील अभय द्विवेदी वायूसेनेतून निवृत्त झाले आहेत.
अमिषाने नुकतीच बारावीची, तर रेशूने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास स्कूटी देण्याचं आश्वासन दोघींच्या पालकांनी दिलं होतं. त्यामुळे दोघींनीही स्कूटी शिकायला सुरुवात केली होती.
दोघी रविवारी गल्लीतच स्कूटी चालवत होत्या. त्यानंतर अमिषा स्कूटी घेऊन हरजेंद्रनगर फ्लायओव्हरवर पोहचली, तर रेशू मागे बसली होती. अचानक अमिषाचं स्कूटरवरुन नियंत्रण सुटलं आणि त्या डिव्हायडरवर आपटल्या.
दोघींना जखमी अवस्थेत काशिराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी हेल्मेट घातलं असतं, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement