एक्स्प्लोर

Coronavirus | लंडनमधून भारतात आलेले एअर इंडियाचे 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उतरलेले प्रवासी क्वॉरंटाईन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार RT-PCR चाचणी निगेटिव्ह आलेल्या या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाइन रहावं लागणार आहे. जिल्हा कार्यालयात संबंधित प्रवाशाची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: येत्या काही दिवसात देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनशी सुरु असलेल्या विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. भारतातही ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर 23 डिसेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

लंडनहून रात्री भारतात आलेल्या विमान प्रवाशांपैकी दिल्लीतील पाच, कोलकात्यातील दोन, तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय. मुंबईत उतरलेल्या प्रवाशांचे RTPCR अहवाल प्रतिक्षेत असल्याचं सांगण्यात येतंय.

या दरम्यान 21 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजता लंडनहून दिल्लीत पोहोचलेल्या एअर इंडियाच्या विमानातील 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या या विमानातून एकूण 266 प्रवासी भारतात आले आहेत. या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या प्रवाशांना दिल्ली सरकारच्या सरदार वल्लभ भाई पटेल कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रवाशांचे सॅम्पल गोळा करुन ते NCDC मध्ये पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहे.

याचसोबत सकाळी 6.30 वाजता लंडनमधून आलेल्या आणखी एका विमानातून 213 प्रवाशी भारतात आले. या सर्व प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. RT-PCR चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना 7 ते 14 दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनहून दिल्लीला आलेल्या सर्व प्रवाशाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारन घेतला आहे. असे एकूण 6 ते 7 हजार प्रवाशी असण्याची शक्यता आहे असे दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

मुंबई विमानतळावर खबरदारीचा उपाय सोमवारी रात्री उशीरा ब्रिटनमधून मुंबईत दोन विमाने आली होती. त्यातील सर्व प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला असून त्यासाठी 50 बेस्टच्या बसेसची सोय करण्यात आली होती. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यात नव्या स्ट्रेन आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांचे सॅम्पल्स पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटंरला पाठवण्यात आले आहेत. मुंबईत आलेल्या या प्रवाशांचे कोरोना अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. बीएमसीने या सर्व प्रवाशांना 7 ते 14 दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी RT-PCR चाचणी करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget