एक्स्प्लोर

Lockdown 4 | लॉकडाऊन 4 मध्ये झोन ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे; कोणते परिसर कोणत्या झोनमध्ये?

देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आणखी कठोर केल्या आहेत. आतापर्यंत देशभरातील वेगवेगळ्या भागांना रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये विभागण्यात आलं होतं. परंतु, यावेळी एक बफर झोन तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. नक्की कोणत्या आधारावर झोन ठरवण्यात येणार आणि कोणत्या झोनमध्ये काय सूट देण्यात आली आहे, त्याबाबत जाणून घेऊया... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची विभागणी पाच झोनमध्ये
  • रेड झोन
  • ग्रीन झोन
  • ऑरेंज झोन
  • कन्टेंन्मेंट झोन
  • बफर झोन
आणखी एक नवा झोन तयार करण्यात आल्यामुळे नक्की कोणत्या झोनमध्ये काय येणार आणि हे कोण ठरवणार, असे अनेक प्रश्न पडले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना एक पत्र पाठवलं असून त्यामध्ये झोनमध्ये करण्यात आलेल्या वर्गीकरणाबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्याचा अधिकार राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना असणार आहे. तर कन्टेंन्मेंट आणि बफर झोनचा निर्णय जिल्हा प्रशासन करणार आहे. कन्टेंन्मेंट आणि बफर झोन कन्टेंन्मेंट, बफर झोन हे रेड आणि ऑरेंज झोन अंतर्गत येतील. म्हणजेच, जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते, ते हे परिसर असणार आहेत. केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कन्टेंन्मेंट झोनचा निर्णय घेण्यात येईल. कन्टेंन्मेंट झोनमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी?
  • फक्त मेडिकल आणि घरगुती उपयोगाच्या सामांनांची दुकानं उघडणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील
  • आरोग्य मंत्रालयाच्या गाइडलाइन्सचं काटेकोरपणे पालन करावं लागणार
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल
  • परिसरातील सर्व रस्त्यावर नजर ठेवण्यात येईल
  • चौकशी केल्याशिवाय कोणालाही येण्या-जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही
बफर झोनबाबत जाणून घ्या
  • कन्टेंन्मेंट झोनच्या आसपासचा परिसर बफर झोन असणार आहे
  • बफर झोनबाबत निर्णय जिल्हा प्रशासन करणार आहे.
  • बफर झोन असलेल्या परिसरात अधिकाधिक तपासण्या करण्यात येणार
  • आरोग्य सुविधांवर जोर देण्यात येईल
  • संशयित प्रकरणांची जिल्हा कंट्रोल रुमला माहिती देण्यात येणार
  • फेस मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करावं लागणार
  • स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यात येईल
बफर झोनमध्ये संसर्ग वाढण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतील. याव्यतिरिक्त केंद्राने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे अधिकार राज्यांकडे दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार परिस्थिती पाहून तेथील नियम कठोर किंवा शिथील करू शकणार आहे. संबंधित बातम्या :  देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार? लॉकडाऊन 4 मध्ये फक्त स्पेशल ट्रेन, पार्सल आणि मालगाड्या धावणार : भारतीय रेल्वे व्हायरल फोटोमागची दु:खद कहाणी, मुलाच्या मृत्यूपूर्वी शेवटचं पाहताही आलं नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget