(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्वं मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे.
नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे.
लॉकडाऊन-4 मध्ये काय सुरु राहणार?
- ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार.
- स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यासा परवानगी नाही.
- स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार.
- सरकारी कार्यालये सुरु होणार.
- सरकारी कॅन्टिन सुरु राहणार.
लॉकडाऊन-4 मध्ये काय बंद राहणार?
- विमानसेवा बंद राहणार.
- मेट्रो सेवा बंद राहणार.
- शाळा-कॉलेज बंद राहणार.
- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार.
- थिएटर, शॉपिंग मॉल, जिमही बंदच राहणार.
- धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परवानगी नाही.
कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी आपापसातल्या सहमतीतून आंतराज्यीय वाहतूक सुरु होऊ शकते. मॉल आणि कंटेनमेंट झोनमध्ये दुकान वगळता इतर ठिकाणी सर्व प्रकारचे दुकान सुरु होऊ शकतात. रेस्टॉरंटमधून केवळ होम डिलिव्हरी करता येणार.
झोन ठरवण्याचे अधिकार राज्यांना
रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन, कंटेनमेंट झोनबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या राज्यांना असणार आहेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियामावलीचं पालन करणे सर्व राज्यांना बंधनकारक असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल. रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
लॉकडाऊनचे टप्पे
लॉकडाऊन 1 - 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस) लॉकडाऊन 2 - 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस) लॉकडाऊन 3 - 4 मे ते 17 मे (14 दिवस) लॉकडाऊन 4 - 18 मे ते 31 मे (दिवस)
देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्य़ा 90,927+ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2852+ जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. गेल्या 24 तासात 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3970 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
Lockdown 4.0 | देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला, लॉकडाऊन 4.0 ची अधिकृत घोषणा