(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today in India: गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 13.11 आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून, ओमायक्रनचा धोका देखील वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 488 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण हे 11 लाख 17 हजार 531 आहेत. तर गेल्या 24 तासात 84 हजार 825 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
देशात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत 5 हजार 488 रुग्ण आढळले असून, 2 हजार 162 रुग्ण त्यातून बरे होऊन बाहेर आले आहेत. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात असून, त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत बुधुवारी जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. बुधुवारी राज्यात 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यात 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: