Kushinagar Well Incident : लग्नसोहळ्यात मोठी दुर्घटना, दोन लहान मुलांसह 11 महिलांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Kushinagar Well Incident : उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये मोठी दुर्घटना. एकूण 11 जणांचा मृत्यू, लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे.
People Died In Kushinagar's Wedding Program : उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नसमा लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरझण पडलं असून त्याचं रुपांतर शोकात झालं. जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत पडून 11 लहान मुलं आणि महिलांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. लग्नासोहळ्याचे विधी पार पडत असताना हा अपघात झाला. यावेळी विहिरीच्या स्लॅबवर लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, विहिरीच्या स्लॅबवर जास्त भार पडल्यामुळं तो कोसळला आणि त्यावर बसलेले सर्वजण विहिरीत पडले. या अपघातामुळं लग्नाच्या आनंदाचं रूपांतर शोकात झालं आहे. सध्या प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.
कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगम यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, "अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल." ते म्हणाले, "नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती, जिच्यावर स्लॅब होता. त्या स्लॅबवर लग्नसोहळ्या दरम्यान लहान मुलं आणि महिला बसल्या होत्या, त्या दरम्यान स्लॅब कोसळला आणि मलबा त्यांच्यावर पडला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मुख्यमंत्री योगींकडून तीव्र शोक व्यक्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्वीट केलं की, "यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळणार वाढीव पगार?
- Hijab Controversy : हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार : असदुद्दीन ओवेसी
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा