एक्स्प्लोर
25 कोटींच्या नोटा बदलणाऱ्या व्यावसायिकाला अखेर मुंबईत बेड्या
नवी दिल्ली : तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. ईडीने लोढासाठी लूकआऊट नोटीस बजावली होती.
लोढानेच कर्नाटकातले उद्योगपती शेखर रेड्डी यांचे 120 कोटी, दिल्लीतला वकिल रोहित टंडन याचे 25 कोटी बदलून दिले होते. लोढा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुंबई विमानतळावर कारवाई केली. रेड्डीना काल सीबीआयने अटक केली होती.
ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय पारसमल लोढाला दिल्लीतल्या कोर्टात हजर करणार आहे. शिवाय लोढाकडे 25 कोटी रुपये बदलून देण्याइतक्या नव्या नोटा कुठून आल्या, याचाही उलगडा होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement