एक्स्प्लोर
Advertisement
वायरल सत्य : वाजपेयींचं निधन आणि मोदींच्या 'त्या' फोटोचा काहीच संबंध नाही!
वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे हा वायरल होणारा फोटो वाजपेयींच्या निधनानंतरचा नाही. पर्यायाने फोटोसोबत पसरवली जाणारी माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली दिली, तर काहींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र यातच एक फोटो वायरल होत होता, ज्यात दावा केला जात होता, की वाजपेयींच्या निधनानंतर एम्सच्या डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते. मात्र वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे हा वायरल होणारा फोटो तेव्हाचा नसल्याचे उघड झाले आहे.
काय आहे वायरल फोटो?
एम्समध्ये डॉक्टरांशी बातचीत करतानाचा पंतप्रधान मोदींचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. या फोटोतून असा दावा केला जातोय, की वाजपेयींच्या निधनानंतर मोदी डॉक्टरांशी बोलताना हसत आहेत. एकीकडे सगळीकडे शोकाकूल वातावरण होतं, तर त्यात मोदींचा हा फोटो वायरल होत होता.
पडताळणीत समोर काय आलं?
एबीपी न्यूजने या फोटोची पडताळणी केली. त्यात हे समोर आलं, की हा फोटो एम्समधीलच आहे. कारण, एम्समधील व्हिडीओ एबीपी न्यूजकडे अगोदरपासूनच होता. हा फोटो आणि आमच्याकडील दृश्य मिळवून पाहिली असता मोदींचे कपडे हुबेहूब असल्याचं उघड झालं. सोबत सुरक्षा रक्षकही दिसत आहेत. मात्र वाजपेयींच्या निधनानंतर डॉक्टरांशी बोलताना मोदी हसत आहेत, असा दावा करणं योग्य ठरणार नाही.
फोटोचं सत्य काय?
पंतप्रधान मोदी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करुन 16 ऑगस्टला दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी एम्समधून बाहेर पडले. तर वाजपेयींच्या निधनाची घोषणा सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी करण्यात आली. म्हणजेच वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे हा वायरल होणारा फोटो वाजपेयींच्या निधनानंतरचा नाही. पर्यायाने फोटोसोबत पसरवली जाणारी माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement