बापरे! कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 'या' राज्यातील सरकारने जमा केला 350 कोटी रुपयांचा दंड
यामध्ये सर्वाधिक दंड हा मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 42.74 लाख लोकांकडून 214 कोटी वसूल करण्यात आले आहेत.
Corona Virus : देशभरासह संपूर्ण जगाला मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona Virus) पछाडून सोडले आहे. कोरोनामुळे अनेक जणांचं आयुूष्य़ उध्वस्त झालं आहे. दरम्यान या कठीण काळात सर्व स्तरातील प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करत नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले असून हे निर्बंध तो़डणारेही अनेकजण होते. अशांकडून शासनानेही चांगलाच दंड वसूल केला. दरम्यान भारतातील एका राज्य सरकारने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल 350 कोटी रुपये दंड वसूल केला.
हे राज्य म्हणजे केरळ असून केरळ सरकारने दोन वर्षांपासून राज्यात प्रतिबंध लावले होते. यावेळी हे प्रतिबंध तोडणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांनी दंड वसून केला आहे. आकडेवारीचा विचार करता केरळ सरकारने कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जवळपास 350 कोटी रुपये वसूल केले आहेत. सर्वाधिक दंड हा मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 42.74 लाख लोकांकडून 214 कोटी वसूल करण्यात आले आहेत.
देशात 16 हजार 741 कोरोनारुग्ण
देशात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1660 नवीन रुग्ण आढळले असून 4100 लोकांचा मृत्यू झाला आहे (या मृत्यूंमध्ये काही राज्यांमधील आधी नोंद न झालेल्या मृत्यूंचा समावेळ आहे). काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात 2 हजार 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 741 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 20 हजार 855 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 80 हजार 436 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha