एक्स्प्लोर
Indian Army I भारतीय लष्कराचा अभ्यास करण्यासाठी केनियाचे आर्मी पथक बेळगावात
देशातील लष्कराचा अभ्यास करण्यासाठी केनियातील आर्मीचे एक पथक भारताच्या दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यादरम्यान हे पथक देशातील विविध भागातील प्रशिक्षण केंद्रांना भेट देणार आहे. याच पार्श्वभूमीवर या पथकाने बेळगावातील ज्युनियर लिडर्स विंगला भेट दिली.
बेळगाव - भारतीय लष्करातर्फे भारतात विविध लष्करी प्रशिक्षण केंद्रावर दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण आणि तंत्राचा अभ्यास करण्यासाठी केनिया आर्मीचे पथक भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी बेळगावच्या ज्युनियर लिडर्स विंगला भेट दिली. ज्युनियर लिडर्स विंग येथे कमांडो प्रशिक्षण दिले जाते. या दौऱ्याच्या माध्यमातून केनियाची आर्मी भारतीय लष्कर आणि त्यांच्या युद्धशास्त्राचा अभ्यास करणार आहे. याआधीही अनेक आफ्रिकन देशातील सैन्य हे भारतीय लष्कराचा अभ्यास करण्यासाठी देशात आलेले आहेत.
केनिया आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वॉल्टर कोईपटॉन यांच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर आलेल्या लष्कराच्या पथकाने बेळगावच्या ज्युनियर लिडर्स विंगला भेट दिली. यावेळी जे एल विंगचे कमांडर मेजर जनरल अलोक काकेर यांनी त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान जे एल विंगमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती काकेर यांनी दिली. प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची पाहणी केनिया लष्कराच्या पथकाने केली. तेथील प्रशिक्षकांशी चर्चा देखील केली. प्रशिक्षणाच्या सुविधा पाहून केनियन पथकाने समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा, व विविध वस्तूंची पाहणीही केनिया आर्मीच्या पथकाने केली. केनियाच्या लष्कराचे 5 जणांचे पथक लेफ्टनंट जनरल वॉल्टर कोईपटॉन यांच्या नेतृत्वाखाली 5 दिवसाच्या बेळगाव भेटीवर आले आहे. भारतातील विविध ठिकाणी लष्कराच्या तळांना हे पथक भेट देऊन माहिती घेणार आहे. 2018 मध्ये भारतीय संरक्षण सचिवांच्या नेतृत्वाखाली केनियाला गेले होते. त्यावेळी लष्करी माहिती आदान प्रदान करण्याबाबत करार झाला होता.
बेळगावमधील ज्युनियर लिडर्स विंग येथे लष्करातील अधिकाऱ्यांना कमांडो प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेली व्यक्ती मृत्यू आणि भय हे शब्दच विसरते. अत्यंत कमी खाद्यपदार्थावर जंगलात राहणे, अत्यंत कमी वेळेत अडथळे पार करणे, नदी, नाले पार करून शत्रू किंवा अतिरेकी तळावर हल्ला करणे, स्फोटके हाताळणे, लपून बसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे अशा प्रशिक्षणा बरोबरच जंगल, डोंगर भागात मोहीम राबवणे, हेलिकॉप्टरमधून उतरून कारवाई करणे असे विविध प्रकारचे प्रशिक्षण ज्युनियर लिडर्स विंगमध्ये दिले जाते. म्हणून भारत दौऱ्यावर आलेल्या मित्र राष्ट्रांच्या लष्करी पथकाला ज्युनियर लिडर्स विंगला भेट देण्यासाठी पाठवले जाते.
संबंधित बातम्या -
सियाचीनमध्ये हिमस्खलनामुळे बर्फाखाली दबून सहा जवान शहीद, दोन बेपत्ता
भारताचं पाकड्यांना चोख उत्तर; 22 दहशतवाद्यांचा खात्मा तर 11 पाकिस्तानी सैनिक ठार
भरती की हाल? | लष्कराच्या भरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल, देशसेवेचा वसा घेतलेल्यांची अवहेलना कोणामुळे? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement