एक्स्प्लोर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या अकरा हजार मतांनी पिछाडीवर

Karnataka Assembly Election Results 2018 live updates: काँग्रेसने सुरुवातीला आघाडी तर घेतली, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामैय्या जवळपास साडे अकरा हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live Update: कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेसने सुरुवातीला आघाडी तर घेतली, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामैय्या जवळपास साडे अकरा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. (सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत) सिद्धरामैय्या बदामी आणि चामुंडेश्वरी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. यापैकी चामुंडेश्वरी मतदारसंघात ते मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. तर जेडीएसचा उमेदवार आघाडीवर आहे. कर्नाटकात 224 पैकी 222 जागांवर निवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 112 आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडलं होतं. यंदा 72.13 टक्के मतदान झाल्यामुळे कर्नाटकचा गड काँग्रेस राखणार की भाजप सत्ता काबीज करणार हे काही क्षणात स्पष्ट होईल. एबीपी माझावर या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून  दिवसभर पाहू शकता. यामध्ये सुपरफास्ट निकालासोबत तज्ज्ञांचं विश्लेषणही असणार आहे. * राहुल गांधींसमोर आव्हान दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक मोठं आव्हान असणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता असल्याने तीही राखण्याचं आव्हान राहुल यांच्यासमोर आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. तर भाजपने बी एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला 2008 साली सत्ता मिळवून दिली होती. * त्रिशंकू परिस्थिती मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकरच्या भूमिका निभावू शकतो. संबंधित बातम्या :

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: कर्नाटक त्रिशंकूच्या दिशेने

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live : कर्नाटकात सत्ता कोणाची?

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget