एक्स्प्लोर
भाजपला धूळ चारुन सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला काँग्रेस उमेदवार
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट
![भाजपला धूळ चारुन सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला काँग्रेस उमेदवार Karnataka Assembly Election Results 2018: Candidate who won with highest margin latest update भाजपला धूळ चारुन सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला काँग्रेस उमेदवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/15183331/R-Akhand-Srinivas-Murthy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु: कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तर जेडीएस नेते कुमारस्वामींनीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यामुळे कर्नाटकचे राज्यपालच खरे किंगमेकर ठरणार आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आर अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला. पुलकेशीनगर मतदारसंघात काँग्रेसचे आर अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी 81 हजार 626 मतं जास्त मिळवत जागा जिंकली. भाजपच्या सुशीला देवराज यांना धूळ चारण्यात आली.
कनकपुरा मतदारसंघात काँग्रेसच्या डी शिवकुमार यांनी 79 हजार 909 मतांनी विजय मिळवला. शिवकुमार यांनी जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव केला.
कुंडापुरा मतदारसंघात भाजपचे हेलडी शिवकुमार शेट्टी 56 हजार 405 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या राकेश मल्ली यांचा पराभव केला.
बेळगाव दक्षिणेतील मतदारसंघात भाजपचे अभय पाटील 58 हजार 692 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या एम डी लक्ष्मीनारायण यांना हरवलं.
वरुणा मतदारसंघात सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र 58 हजार 616 मतांनी विजयी झाले.
मद्दुर मतदारसंघात जेडीएसचे डीसी थमन्ना 54 हजार 30 मतांनी विजयी झाले.
मल्लेश्वरम मतदारसंघात भाजपचे डॉ. अश्वथ नारायण 54 हजार मतांनी विजयी झाले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बालकर 51 हजार 724 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या संजय पाटलांना हरवलं.
संबंधित बातम्या
खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच
कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?
कोण आहेत कुमारस्वामी?
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना मेटाकुटीला आणणारा बदामी
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)