एक्स्प्लोर
कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली
![कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली Kanpur Goat Cost Rs 21 Lakh कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/13074216/Kanpur_Goat-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कानपूर : बकरी ईदनिमित्त बकरी आणि बोकडांना चांगलीच किंमत मिळत आहे. कानपूरमध्ये बेगनगंज बाजारात सध्या बादल नावाच्या बोकडाचा बोलबाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोकड्याला तब्बल 21 लाखांची बोली लावण्यात आली आहे.
कपड्याचे व्यापारी आकीब खां यांनी एक वर्षाआधी या बोकड्याला सूरतहून 3 लाख 10 हजार रुपयांना आणलं होतं. त्यावेळी बादल लहान होता, परंतु त्याचं वजन 140 किलो होतं. विशेष म्हणजे बादलचा महिन्याचा खर्च सुमारे 30 ते 35 हजार रुपये इतका आहे. बादलचा खुराकही तसाच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बादल दूध, देशी तूप, बदाम, खारीक, चणे, गहू, फळांसह कोल्ड्रिंगही पितो.
बादलला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. तो रस्त्यावरुन गेला तर लोक त्याचे फोटो काढतात. त्याला पाहण्यासाठी देशभरातील लोक कानपूरच्या बाजारात येत आहे. तिथे गुजरातमधील व्यापाऱ्याने बादलला तब्बल 21 लाखांना खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र हा बोकड विकणार नसून त्याची कुर्बानी देणार असल्याचं मालक आकीब खां यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)