एक्स्प्लोर
अवैध शिकारीप्रकरणी गोल्फर ज्योती रंधावाला अटक
आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावाला अवैध शिकारीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावाला अवैध शिकारीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातून ज्योती रंधावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तसंच शिकारीचं साहित्यही जप्त केलं आहे.
आंतरराष्ट्रीय गोल्फर म्हणून परिचित असलेला ज्योतींदर रंधावा अवनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मदत म्हणून यवतमाळलाही आला होता. ज्योती रंधावासोबत महेश विराजदारलाही अटक करण्यात आली आहे.
कतरनिया घाट जंगलातील मोतीपूर फॉरेस्ट रेंजमध्ये त्यांनी ही अवैध शिकार केल्याचं उघड झालं आहे. वनविभागाकडून शिकारीसाठी वापरली गेलेली हत्यारं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. ज्योती रंधावा अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा पती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement