एक्स्प्लोर
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना खांबाला बांधून शंभर फटके द्या : काटजू

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना खांबाला विवस्त्र बाधून 100 फटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त ट्विट केलं आहे. बीसीसीआय आणि जस्टिस लोढा यांच्यातील वादात आता काटजूंनी उडी टाकली आहे. मार्कंडेय काटजूंच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. "लोढांनी बीसीसीआयला दिलेली वागणूक पुरेशी नाही. लोढांनी खरं तर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना खांबाला बांधून त्यांना शंभर फटके मारायला हवेत," असं काटजूंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/mkatju/status/783214582667980800 सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं होतं. या चार सदस्यीय समितीत बीसीसीआयचे वकिल अभिनव मुखर्जी यांच्यासह अन्य दोन कायदेतज्ज्ञांचा समावेश आहे.
आणखी वाचा























