एक्स्प्लोर

JEE NEET Exam Center List: जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले, राज्यनिहाय सेंटर्सची घोषणा

NTA JEE NEET Exam Centers State wise list: देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे.

नवी दिल्ली: देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर  नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.

जेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.

जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी

अनेक नेत्यांचा विरोध

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, चिराग पासवान आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नीट परीक्षा आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नीट आणि जेईई परीक्षा दिवाळीपर्यंत न घेण्याची आणि तसे निर्देश शिक्षण मंत्रालयाला देण्याची मागणी केली आहे.

NEET JEE 2020 | मोठा निर्णय... 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिक फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget