एक्स्प्लोर

Pahalgam terrorist first photo: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, पठाणी सूटमध्ये अत्याधूनिक शस्त्र हाती

मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) पहलकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला . पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे .फॉरेन्सिक टीम त्यांच्यासोबत आहे .

Pahalgam terrorist first photo: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झालाय. 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा आता पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसले आहे . या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती .हल्ला झाल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा हेही ठरवण्यात आले होते . (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी ते कोणत्या धर्माचे आहेत अशी विचारणा केली .काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची भयानक माहितीही समोर येतेय . या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झालाय .

मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) पहलकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला .दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे .टीआरएफ या दहशतवादी संघटनेने अभियान हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारली आहे .मार्चमध्ये झालेल्या बर्फ वृष्टी नंतर अनेक पर्यटक काश्मीरला येतात .यंदा पर्यटन वाढल्यामुळे कश्मीरी नागरिक आनंदात असतानाच दहशतवाद्यांनी सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट करत हा भ्याड हल्ला केला आहे . दरम्यान, दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर बाहेर पडण्याची योजना देखील आखली होती .हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेला मात्र हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आला आहे .या फोटोच्या मदतीने सुरक्षा संस्थांना बरीच मदत मिळत आहे. हल्ल्यानंतर हा दहशतवादी पळून गेला आहे. लष्कराने पहलगाम मध्ये शोध मोहीम सुरू केली आहे . 

पहलगाममध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे .फॉरेन्सिक टीम त्यांच्यासोबत आहे . जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा  मागमूस काढला जात आहे .लष्कराचे जवान हे ड्रोन चा वापर करत शोध घेत असून भारतीय लष्कराने LH हेलिकॉप्टर तैनात केले आहेत .सर्च ऑपरेशन साठी लष्कर या हेलिकॉप्टर चा वापर करत आहे .

हल्ल्यात महाराष्ट्रातल्या पर्यटकांचाही समावेश

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

सौदी अरेबियाहून परत येताच पंतप्रधान मोदींनी घेतले हल्ल्याचे अपडेट

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झाले होते .पंतप्रधान तिथे पोहोचल्यानंतर पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला होणार होता अशी सूत्रांची माहिती आहे .पंतप्रधान मोदींना दौऱ्याच्या मध्येच भारतात परतावे लागले .ते बुधवारी दिल्लीत पोहोचले .पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अजित डोभाल यांनी या हल्ल्याबाबत त्यांना माहिती दिली .पंतप्रधान लवकरच सीसीएस बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे .

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
Embed widget