एक्स्प्लोर
मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश
जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.
नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार उद्या 31 ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.
जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. गुरुवार, ३१ ऑक्टोबरपासून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश कार्यरत होतील. केंद्र सरकारने गुजारातमधील सनदी अधिकारी जी सी मुरमू यांची जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आली आहे. तर राधाकृष्ण माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असणार आहे. दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मिरचा कारभार चालणार आहे. तर लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असणार नाही. या प्रदेशाचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून पाहिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आहे. ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार असून, या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement