एक्स्प्लोर
पुंछमध्ये पुन्हा चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यदलात आजही चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आहे. आज सर्च ऑपरेशन सुरु झालं, त्यावेळी दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरु केला.
पुंछमध्ये मिनी सेक्रेटरिएटमध्ये एक अतिरेकी लपला आहे. परंतु दहशतवाद्यांची एकूण संख्या नेमकी किती याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
पुंछ जिल्ह्याच्या अल्लाहपीर भागातील एका घरात दहशतवादी लपून बसले होते. हे दहशतवादी मोठ्या मोहीमेवर आले होते, अशी माहिती मिळत होती. पुंछमधील सैन्याच्या 93 ब्रिगेडचं मुख्यालय त्यांच्या निशाण्यावर होतं, असं म्हटलं जात आहे.
कालच्या 11 तासांच्या चकमकीत 3 दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र या चकमकीत पोलिस कॉन्स्टेबल राजिंदर कुमार शहीद झाले. आजही सर्च ऑपरेशनदरम्याच पुन्हा चकमक सुरु झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे.
तर अतिरेक्या हल्ल्यात सब इन्स्पेक्टर मंजूर हुसैन, तारिक हुसैन यांच्यासह पाच पोलिस आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाला. पुंछमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement