एक्स्प्लोर
काश्मीरमध्ये लष्कराच्या गाडीवर गोळीबार, एक दहशतवादी ठार
काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या एका मोबाइल व्हॅनवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. पण सुरक्षा दलाचे जवान सतर्क असल्याने दहशतवाद्यांचा हा हल्ला फसला. त्यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्यासह त्याचे तीन साथीदारही ठार झाले.
श्रीनगर : काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या एका मोबाइल व्हॅनवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. पण सुरक्षा दलाचे जवान सतर्क असल्याने दहशतवाद्यांचा हा हल्ला फसला. त्यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्यासह त्याचे तीन साथीदारही ठार झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका चेक पॉईंटवर मोबाइल व्हॅनने एका कारला थांबण्याचा इशारा केला. पण ती कार न थांबताच पुढे निघाली आणि त्यातील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील त्यांना तात्काळ चोख प्रत्युत्तर दिलं. ज्यात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या गोळीबारात दहशतवाद्यांसोबत कारमधील तीन जणांचाही मृत्यू झाला. पण हे तिघेही दहशतवाद्यांना मदत करणारे होते अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली.
या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली अशून त्याचं नाव शाहिद अहमद डार असं असून तो शोपियाच्या जामनगरी येथे राहत होता.
20 वर्षाचा शाहिद हा काही दिवसांपूर्वीच लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. दोन मार्चला शाहिदचा फोटो लष्कराचा कुख्यात दहशतवादी नावीद जट्टसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नावीद जट्ट हा सहा फेब्रुवारीला श्रीनगरच्या एसएमएच रुग्णालयात गोळीबार करुन पोलीसांच्या तावडीतून निसटला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement