(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO Moon Mission : राकेश शर्मा पहिले भारतीय अंतराळवीर, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अंतराळात साधला होता संवाद
ISRO Moon Mission : भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संवाद साधला होता. त्यावेळ राकेश शर्मा यांनी पृथ्वीचं वर्णन करताना म्हटलं की, ''सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.''
मुंबई : भारताची महत्वाकांक्षी चंद्रमोहिम अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही तासांत भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारताने तीन चंद्रमोहिमा हाती घेतल्या आहेत. इथपर्यंतचा प्रवास भारतासाठी फार खडतर आहे. महत्वाचं म्हणजे भारताच्या या चंद्रमोहिमा इतर देशांच्या तुलनेने फार कमी खर्चात झाल्या आहेत. चंद्र मोहीमांदर्भात बोलताना अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक राकेश शर्मा यांना विसरता येणं शक्यच नाही.
अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय राकेश शर्मा
राकेश शर्मा अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय. 1984 मधील सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-11 मिशनचा ते एक भाग होते. सोयुझ टी-11 अंतराळयानातून प्रवास केला आणि सॅल्युट 7 स्पेस स्टेशनवर आठ दिवस घालवले.
इंदिरा गांधींनी अंतराळात साधला होता संवाद
2 एप्रिल 1984 साली पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर आणि भारतीय वायुसेनेचे माजी पायलट राकेश शर्मा यांनी सोयुज टी-11 या अंतराळ यानातून उड्डाण केलं. त्यांनी 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अवकाशात प्रवास केला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनीही त्यांच्याशी संवाद साधला होता.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 22, 2023
The mission is on schedule.
Systems are undergoing regular checks.
Smooth sailing is continuing.
The Mission Operations Complex (MOX) is buzzed with energy & excitement!
The live telecast of the landing operations at MOX/ISTRAC begins at 17:20 Hrs. IST… pic.twitter.com/Ucfg9HAvrY
भारताच्या आतापर्यंतच्या चंद्र मोहिमा
भारताच्या प्रत्येक चांद्रयान मोहिमेत चंद्रावर पोहोचण्याचा कालावधी कमी कमी होत गेला आहे. भारताने तीन वेळा चंद्र मोहिम हाती घेतली आहे. 2008 पासून आतापर्यंत भारताच्या तीन चांद्र मोहीमा झाल्या आहेत.
चांद्रयान-1
28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली. 12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झालं. सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.
चांद्रयान-2
22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली. 6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला. चांद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.
चांद्रयान-3
त्यानंतर 2023 मध्ये नव्या उमेदीने इस्रोचं चांद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालं. 14 जुलै दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने यशस्वीरित्या झेपावलं. 5 ऑगस्ट रोजी विक्रम लँडरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता चांद्रयान-3 लँडिंगसाठी सज्ज झालं आहे. 40 दिवसांनतर आता 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.