एक्स्प्लोर

Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न, यश फक्त 8 वेळा; जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?

Lunar Mission around The World : 70 वर्षात 111 चंद्रमोहिमा, फक्त 8 मोहीमांमध्ये यश; जगभरातील देशांच्या आतापर्यंतच्या चंद्रमोहिमांबाबत सविस्तर माहिती

मुंबई : ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहतोय, तो क्षण काही तासांवर येवून ठेपलाय. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड होणार आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अवघ्या देशासाठी पाहिलेलं हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. चंद्रावर जाण्याचं स्वप्न अनेक देशांनी पाहिलं. चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण चंद्रावर पोहोचण्याच्या प्रवासात अनेकदा वाटेतच विघ्न आली.

70 वर्षात 111 चंद्रमोहिमा, फक्त 8 वेळा यश

70 वर्षात जगभरातील देशांनी एकूण 111 चंद्रमोहिमा हाती घेतल्या पण, सर्वांना यश मिळालं असं नाही. या 111 पैकी 66 चंद्रमोहिमा अयशस्वी ठरल्या. तर, 41 मोहिमा पूर्णपणे अपयशी ठरल्या. फक्त 8 चंद्रमोहिमांमध्ये काहीसं यश मिळालं.

'या' देशांकडून चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न

1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चांद्र मोहिमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मशीन्स होते. यूरोपचं स्मार्ट-1, जपानचं सेलेन, चीनचं चांगई-1, भारताचं चांद्रयान-1 अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशन यांचा यात समावेश आहे. आतापर्यतच्या चंद्रमोहिमा आव्हानात्मक होत्या. अमेरिकेलाही अनेकदा चांद्रमोहिमेत अपयश आलं. 

आव्हानात्मक चांद्रमोहिमा

  • 17 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेने पहिली चांद्रमोहीम आखली, जी अयशस्वी ठरली. 
  • 1958मध्ये अमेरिका आणि सोव्हियत महासंघाने सहा चांद्रमोहिमा आखल्या, ज्या अयशस्वी ठरल्या.
  • 1967 मध्ये अमेरिकेचं सर्वेयर 4 यान चंद्रावर उतरण्यापूर्वीच यानाचा संपर्क तुटला.
  • 1969 ते 1974 सोव्हियत महासंघाचं लुना-15, लुना-18, लुना-23 चंद्रावर कोसळलं.
  • 2019 रोजी भारताचं चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क अखेरच्या क्षणी तुटला.
  • 19 ऑगस्ट 2023 ला रशियाचं लुना-25 चंद्रावर कोसळलं.

2008 पासून आतापर्यंत भारताच्या तीन चांद्र मोहिमा झाल्या आहेत.

चांद्रयान-1 

  • 28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली.
  • 12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झालं.
  • सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.

चांद्रयान-2

  • त्यानंतर 22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली. 
  • 6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला.
  • चांद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.

चांद्रयान-3

  • 2023 म्हणजे चालू वर्षात नव्या उमेदीने चांद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालं.
  • 14 जुलै दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावलं.
  • 5 ऑगस्ट रोजी लॅण्डरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चांद्रयान-3 लँडिंगसाठी सज्ज झालं आहे.
  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-3 ला 40 दिवस लागतील

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chandrayaan 3 Landing : विक्रम लँडरच्या कॅमेऱ्यातून चंद्र कसा दिसतो? इस्रोनं शेअर केला खास व्हिडीओ; तुम्ही पाहिला का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget