नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
मुंबईच्या अंधेरी मरोळ परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली.
मुंबई : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील 25 वर्षीय युवतीने मुंबईतील अंधेरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासानंतर मुलीच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत धरत आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलमान्वये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता, याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीचे काका विवेककुमार तुली यांनी त्यांच्या मित्रासोबत केलेल्या संवादातून ही माहिती समोर आली आहे. सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट (Pilot) म्हणून कार्यरत होती. राजधानी दिल्लीतील एका प्रशिक्षण संस्थेत सृष्टी आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य पंडित यांची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर, ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, हेच प्रेम सृष्टीच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचे एफआयआरममधून समोर येत आहे.
मुंबईच्या अंधेरी मरोळ परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला अटक केली आहे. 25 वर्षीय सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. 25 तारखेला सृष्टीने आपल्या राहता घरी गळफास लावून आत्महत्या केली, सृष्टीच्या नातेवाईकांना माहिती मिळतात त्यांनी सृष्टी ला सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. सृष्टी ही गोरखपूरमधली पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती, सृष्टीच्या अशा अकाली निधनाने गावकऱ्यांवरही शोककळा पसरल्याचे दिसून आले.
सृष्टीच्या नातेवाईकांनी याबाबत फिर्याद दिली असून तक्रारी अनुसार पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत सृष्टीचा बॉयफ्रेंडला दिल्लीमधून अटक केली आहे. अटक बॉयफ्रेंडचे नाव आदित्य पंडित आहे. सृष्टी आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. सध्या पवई पोलिसांकडून अटक बोयफ्रेंडला कोर्टात हजर केले असता कोर्टामधून त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सृष्टीने टोकाचा पाऊल का उचलला यामागे बॉयफ्रेंड च्या हात आहे का या सर्व संदर्भात अधिक तपास पवई पोलीस करत आहेत. मात्र, एफआयआरमधील माहितीनुसार, सृष्टी आणि तिच्या प्रियकरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता.
आदित्य पंडितने तिच्यासोबत भांडण करुन तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिला. तो तिच्या बँक खात्यातून पैसेही काढून घ्यायचा. तर, नॉन व्हेज खाल्ल्यामुळेही तो तिच्यावर ओरडला होता अशी माहिती तक्रारीतून काकांनी दिली आहे. गोरखपूर येथील सृष्टीचे काका हे गॅस एजन्सी चालवतात. त्यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली असून, आदित्यकडून सृष्टीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न होत होता, तो तिच्याशी सातत्याने भांडण होता. आदित्यच्या बहिणीच्या साखरपुडा कार्यक्रमास न गेल्यामुळे त्याने सृष्टीसोबत गेल्या 10 दिवसांपासून बोलणं बंद केलं होतं, असे फिर्यादीत म्हटलं आहे.