एक्स्प्लोर
Chandrayaan-3 : ...तर चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलणार, 23 ऑगस्ट नाही 'या' दिवशी होण्याची शक्यता
Chandrayaan-3 Landing May Postponed : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे.

ISRO Chandrayaan-3 Landing
1/9

23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडर कॅमऱ्याद्वारे लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधत आहे.
2/9

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत एक मोठी माहिती दिली आहे. अनुकूल वातावरण नसल्याचं चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलण्यात येईल.
3/9

लँडर मॉड्यूलशी संबंधित कोणतेही घटक प्रतिकूल दिसल्यास, 23 ऑगस्टला लँडिंग होणार नाही.
4/9

लँडिंगसाठी पोषक वातावरण नसल्यास लँडिंग 27 ऑगस्टला केलं जाईल, असं स्पेस अॅप्लिकेशन सेंटर-इस्रोने सोमवारी सांगितलं.
5/9

इस्रो-स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद-संचालक नीलेश एम देसाई यांनी सांगितलं की, लँडर मॉड्यूलचे आरोग्य आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन लँडिंगबाबत निर्णय घेतला जाईल.
6/9

त्यांनी पुढे म्हटलं की, "23 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी, आम्ही लँडर मॉड्यूल आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारावर त्यावेळी चंद्रावर उतरणे योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ.''
7/9

जर कोणतेही घटक अनुकूल नसतील, तर आम्ही 27 ऑगस्ट रोजी मॉड्यूल चंद्रावर उतरवू. योग्य वातावरण असल्याच आम्ही 23 ऑगस्ट रोजी मॉड्यूल उतरवू शकू, असं संचालक देसाई यांनी सांगितलं आहे.
8/9

आता अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत. इस्रोचं (ISRO Moon Mission) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे.
9/9

चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ जात आहे.
Published at : 22 Aug 2023 07:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
