IRCTC Religious tour package: धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी रेल्वेचं 11 दिवसांचं स्पेशल टूर पॅकेज
स्पेशल ट्रेनमध्ये संपूर्ण प्रवासात एका व्यक्तीचे भाडे 10,400 रुपये असेल. यासह, कम्फर्ट पॅकेजमधील किंमत प्रति व्यक्ती सुमारे 17,330 रुपये आहे.
IRCTC Religious tour package: ज्यांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक सुवर्णसंधी आणली आहे. IRCTC च्या वेबसाइटनुसार, अत्यंत कमी पैशात वैष्णो देवी ते अयोध्या आणि हरिद्वार इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. हा संपूर्ण प्रवास 10 रात्री आणि 11 दिवसांचा असणार आहे. रेल्वेने सुरु केलेले हे विशेष टूर पॅकेज परवणारं आहे. याशिवाय यात मिळणाऱ्या सुविधा देखील खूप चांगल्या आहेत. या दौऱ्यावर तुम्ही एकटे किंवा संपूर्ण कुटुंबासह जाऊ शकता.
IRCTC ने या विशेष दौऱ्याला उत्तर भारत यात्रा वैष्णो देवी असे नाव दिले आहे. या संपूर्ण दौऱ्यात मथुरा, वैष्णो देवी, अमृतसर, हरिद्वार आणि दिल्लीसारख्या शहरांना भेट देता येणार आहे. या यात्रेचं बुकिंग IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन करता येणार आहे. तसेच पर्यटक सुविधा केंद्र किंवा रेल्वेच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील बुकींग करता येणार आहे. या संपूर्ण प्रवासात एका व्यक्तीचे भाडे 10,400 रुपये असेल. यासह, कम्फर्ट पॅकेजमधील किंमत प्रति व्यक्ती सुमारे 17,330 रुपये आहे.
ट्रेन कुठे-कुठे जाणार?
ट्रेनचे बोर्डिंग पॉईंट्स- रेनिगुंटा, वेल्लोर, अंगुल, विजयवाडा, गुंटूर, नालगोंडा, सिकंदराबाद, काजीपेट, पेड्डापल्ली, रामागुंडम आणि नागपूर. ट्रेनचे डी बोर्डिंग पॉईंट्स - नागपूर, रामागुंडम, पेड्डापल्ली, काजीपेट, सिकंदराबाद, नलगोंडा, गुंटूर, विजयवाडा, अंगुल, वेल्लोर आणि रेनिगुंटा. डेस्टिनेशन - आग्रा, मथुरा, वैष्णो देवी, अमृतसर, हरिद्वार आणि दिल्ली.
टूर पॅकेजमध्ये असलेल्या सुविधा
ट्रेनच्या स्लीपर कोचने प्रवास करत असाल तर तुम्हाला रात्रभर मुक्काम आणि सकाळचे हॉल/डॉरमेट्री निवास उपलब्ध करून दिले जाईल जेणेकरून तुम्ही इथे राहू शकाल. रात्रभर मुक्कामासाठी हॉटेलची सोयही केली जात आहे. अशा डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी फ्रेश होण्यासाठी रुम दिली जाईल. सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.