IRCTC helping guide : ट्रेनचे तिकीट बुक करताना IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'हे' वाचा
आजच्या डिजीटलच्या युगात अनेक प्रवासी IRCTC वेबसाइटद्वारे ट्रेन तिकीट बुक करतात. पण जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर रेल्वेचे तिकीट काढण्यात अडचण येऊ शकते.
IRCTC helping guide : आजच्या डिजीटलच्या युगात अनेक प्रवासी IRCTC वेबसाइटद्वारे ट्रेन तिकीट बुक करतात. पण जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर रेल्वेचे तिकीट काढण्यात अडचण येऊ शकते. पण जेव्हा तुम्ही तुमचा IRCTC लॉगिन पासवर्ड विसरलात, तर तुम्हाला तो कसा मिळवता येईल? तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइटवरून तिकीट बुक करायचे असेल, परंतु पासवर्ड विसरलात? तर तुमच्यासाठी पासवर्ड पुन्हा सेट करण्याचा मार्ग येथे आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर..
IRCTC पासवर्ड कसा मिळवाल? जाणून घ्या
-सर्वात प्रथम IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-https://www.irctc.co.in/nget/train-search आणि तुमचा IRCTC अकाऊंटचा लॉगिन आयडी टाका.
-पासवर्ड रिसेट करण्यासाठी Forgot Password च्या पर्यायावर जा.
-IRCTC वर नोंदणीकृत असलेला ईमेल आयडी एंटर करा,
-जन्मतारीख आणि कॅप्चासह यूजर आयडी टाका.
-IRCTC तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल Address वर किंवा लिंक केलेल्या नंबरवर तपशील पाठवण्यात येईल,
-ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड पुन्हा मिळवू शकता.
-IRCTC साइटवर पासवर्ड बदलल्यानंतर, तो सुरक्षित ठेवा कारण ही साइट वापरकर्त्यांना पासवर्ड अपडेट करण्यास सांगत नाही
विविध सुविधा उपलब्ध
तुम्हाला तुमच्या पासवर्डद्वारे हवे तेव्हा तुम्ही या वेबसाइटवर लॉग इन करू शकता. तुम्हाला IRCTC वेबसाइटवर फ्लाइट बुक करण्याची सुविधा आणि IRCTC साइटवर उपलब्ध सेवा देखील मिळतात. हॉटेल बुकिंगच्या सुविधेशिवाय, तुम्ही या साइट्सवरून ई-कॅटरिंग, बस बुकिंग, हॉलिडे पॅकेज, टुरिस्ट ट्रेनची सेवा देखील घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
- Chenab Railway Bridge : जम्मू काश्मीरमध्ये बनतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, सुंदर फोटो पाहिलात का?
- रेल्वे प्रवास सुस्साट होणार! तीन वर्षात 400 'वंदे भारत' ट्रेन धावणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा
- Indian Railways New Rules : रात्रीच्या रेल्वे प्रवासात गोंगाट करणाऱ्यांना दणका, रेल्वेची नवी नियमावली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha