(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chenab Railway Bridge : जम्मू काश्मीरमध्ये बनतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, सुंदर फोटो पाहिलात का?
Chenab Railway Bridge : सोशल मीडियावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाच्या कमानीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चिनाब पूल पर्वतांच्या मध्ये ढगांच्या वर दिसत आहे.
Chenab Railway Bridge : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधला जात आहे. लवकरच या पूलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. सोशल मीडियावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाच्या (Chenab Bridge) कमानीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पर्वतांच्या मध्ये चिनाब पूल आणि आजूबाजूला दाटलेले ढग दिसत आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कु अॅपवर हा फोटो शेअर केले आहे.
फोटो शेअर करताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'ढगांवर असलेला जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब ब्रिज' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बांधला जात असलेला चिनाब पूल ढगांच्या वर असं विहंगम दृष्य दिसत आहे. पूलाच्या मागे उंच पर्वत आणि बाजूला पांढऱ्या शुभ्र ढगांची चादर हे दृश्य खूपच मनमोहक आहे. अनेक युजर्सने हा फोटो रिशेअर केला आहे.
मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या व्यतिरिक्त, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील कु अॅपवर चिनाब पुलाची आणखी काही छायाचित्रे शेअर केली आहेत.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
चिनाब नदीवर बांधला जात असणारा हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. नदी सपाटीपासून 359 मीटर उंचीवर असल्याने चिनाब पुलाला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा दर्जा मिळाला आहे. हा पूल फ्रान्समधील आयफिल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्आ महितीनुसार, पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी 'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- Dry Fruits For Health : काजूमुळे होतात हाडे मजबूत, मधुमेही रुग्णांसाठीही उपयुक्त, जाणून घ्या फायदे
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha