(Source: ECI/ABP News/ABP Majha)
International Nelson Mandela Day 2023 : आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन नेमका का साजरा केला जातो? वाचा या दिनाचं महत्व
International Nelson Mandela Day 2023 : संयुक्त राष्ट्र महासभेने नोव्हेंबर 2009 मध्ये शांतता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात मंडेला यांच्या पूर्वीच्या योगदानाची ओळख म्हणून या दिवसाची स्थापना केली. .
International Nelson Mandela Day 2023 : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन (International Nelson Mandela Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन” म्हणून घोषित केले.
दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष हे नेल्सन मंडेला होते. संयुक्त राष्ट्र महासभेने नोव्हेंबर 2009 मध्ये शांतता आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात मंडेला यांच्या पूर्वीच्या योगदानाची ओळख म्हणून या दिवसाची स्थापना केली. यूएनजीएने संघर्ष निराकरण, वंश संबंध, संवर्धन, मानवी हक्कांचे संरक्षण, गरिबीविरूद्ध लढा आणि इतरांमध्ये मानवतेची सेवा करण्यासाठी मूल्ये आणि समर्पण यावर जोर देणारा ठराव स्वीकारला. मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. नंतर 2014 मध्ये, UNGA ने नेल्सन मंडेला पुरस्काराची स्थापना केली ज्यांनी मानवतेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
नेल्सन मंडेला कोण होते?
मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि शांततेचे आंतरराष्ट्रीय प्रवर्तक, नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये झाला. सामाजिक समतेच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या लढ्यामुळे मंडेला हे जगभरात वर्णभेदविरोधी संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल 27 वर्ष तुरुंगात काढावी लागली. मात्र, या लढाईत अखेर त्यांचाच विजय झाला. त्यानंतर लोकशाही मार्गाने ते दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्षही झाले. दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनण्याचा मान नेल्सन मंडेला यांना मिळाला. ‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले. त्यांची छोटी-मोठी चरित्रंही आजवर प्रकाशित झाली. नेल्सन मंडेला यांना ऑक्टोबर 1993 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अखेर 2013 मध्ये नेल्सन मंडेला यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
महत्त्वाच्या बातम्या :