एक्स्प्लोर

Important Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

Important Days in July 2023 : जुलै महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत.

Important Days in July 2023 : अवघ्या दोन दिवसांवर जुलै महिना येऊन ठेपला आहे. जुलै महिन्यात विविध सण साजरे केले जाणार आहेत. या महिन्यात अधिक श्रावण मास देखील आला आहे. तसेच, महाराष्ट्र कृषी दिन, गुरुपौर्णिमा, आषाढी अमावस्या यांसारखे महत्त्वाचे सणही साजरे केले जाणार आहेत. पण, त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 

1 जुलै : National Doctor’s day (जागतिक डॉक्टर्स दिन)

प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. 1991 मध्ये पहिला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला.

1 जुलै : वसंतराव नाईक जयंती

वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी आणि राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते सर्वाधिक काळ म्हणजेच 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. इ.स. 1972 मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या अनेक योजना राबविल्या. 

1 जुलै : महाराष्ट्र कृषी दिन

राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 

1 जुलै : GST दिन. 

GST म्हणजे Goods (वस्तू) and Service Tax (सेवा कर). जीएसटी हा ग्राहकांवर वस्तू किंवा सेवांच्या खरेदीच्या बदल्यात कर म्हणून लावण्यात येत असतो. आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली. 

1 जुलै : National CA day

सन 1949 मध्ये भारतीय संसदेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जुलै हा सीए दिवस म्हणून साजरा केला जातो. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे यावर्षी स्थापनेचा 74 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

3 जुलै : प्लास्टिक बॅग मुक्त दिन

'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन' दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्यांबद्दल आणि जमिनीपासून ते सागरी जीवनापर्यंत नैसर्गिक पर्यावरणाला होणारा गंभीर धोका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी, लोक बैठका, वादविवाद, सामाजिक चर्चा आयोजित करतात आणि लोकांना वैयक्तिक पातळीवर प्लास्टिकच्या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी शपथ घेण्यास प्रोत्साहित करतात. पर्यावरणाला प्लास्टिक पिशव्यांपासून मुक्त करण्यासाठी लोक या दिवशी समुद्रकिनारा स्वच्छ अभियान, समुद्र स्वच्छ अभियान राबवतात.

3 जुलै - गुरुपौर्णिमा 

दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते. 

6 जुलै : संकष्ट चतुर्थी

गुरुवार, 6 जुलै 2023 रोजी आषाढ कृष्ण चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. गणेश उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेश उपासक, भाविक दिवसभराचा उपवास सोडतात. यावर्षीचा चंद्रोदय 10:14 मिनिटांचा आहे. 

6 जुलै : अभिनेता रणवीर सिंग जन्मदिन

रणवीर सिंग हा एक भारतीय अभिनेता आहे. जो बॉलिवूड हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. रणवीरला आतापर्यंत त्याच्या चित्रपटातील कारकिर्दीतील उत्कृष्ट अभिनयासाठी चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2012 पासून फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटींच्या 100 यादीमध्ये त्याचा समावेश आहे.

7 जुलै : महेंद्र सिंग धोनी जन्मदिन. 

महेंद्र सिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी राजपूत परिवारात झाला. 'माही' आणि 'एम.एस. धोनी' या नावाने तो ओळखला जातो. त्या सोबतच तो 'कॅप्टन कूल' म्हणूनही धोनीला ओळखले जाते. त्याने 2007 पासून 2016 पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि 2008 पासून 2014 पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले आहे. त्याने 2007 च्या आयसीसी विश्वचषक टी -20, 2010 आणि 2016 आशिया कप, 2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

8 जुलै : अभिनेत्री नीतू सिंग यांचा जन्मदिन. 

नीतू सिंग या एक भारतीय सिने-अभिनेत्री आहेत. 1966 सालच्या 'दस लाख' ह्या चित्रपटामध्ये बाल-कलाकार म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. नीतू सिंग यांनी आजवर 60 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची जोडी प्रसिद्ध होती. 1980 साली त्यांनी प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले.  

10 जुलै मातृ सुरक्षा दिन 

जगभरात 10 जुलै हा दिवस मातृ सुरक्षा दिन (Matru Suraksha Din)म्हणून साजरा केला जातो. माता आणि होणाऱ्या मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दिवस साजरा करण्याची सुरूवात केली. 2005 सालापासून 10 जुलै सर्वत्र मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे मातांचे आरोग्य आणि मातृत्वादरम्यान मातांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करण्याचा आहे.

11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिन  (World Population Day) 

11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला.

15 जुलै : संत नामदेव महाराज पुण्यतिथी 

संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1272 मध्ये पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. 

17 जुलै : आषाढी अमावस्या 

या वर्षीची आषाढ अमावास्या सोमवार, 17 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. रविवार 16 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.

17 जुलै :  आंतरराष्ट्रीय न्याय दिन (World Day for International Justice)

दरवर्षी आंतरराष्ट्रीय जागतिक 17 जुलै ला साजरा करण्यात येतो यामागचे कारण असे की, 2010 रोजी कंपाला (युगांडा) मध्ये झालेल्या रूम विधान कायद्याचा आढावा परिषदेत राज्य पक्षांच्या असेंब्लीने 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाचा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबुतीकरण यंत्रणा ओळखण्यासाठी तसेच पीडितांच्या हक्कांना सहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी अंतरराष्ट्रीय न्याय जागतिक दिन दर वर्षी 17 जुलैला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन हा रोम विधानचा ऐतिहासिक वापर आणि 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाची नवीन यंत्रणा स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

18 जुलै : अण्णाभाऊ साठ्ये स्मृतिदिन 

तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण जगाला समजेल असं वैश्विक तत्वज्ञान आपल्या साहित्यातून मांडलं.

18 जुलै : आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन. 

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस” म्हणून घोषित केले.

18 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जन्मदिन.

प्रियांका चोप्रा जोनास ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती 5 भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने 2003 साली 'द हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी आणि सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिस वर्ल्ड 2000 स्पर्धेची विजेती, चोप्रा ही भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

20 जुलै : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन (International Chess Day)

बुद्धिबळ हा खेळ म्हणजे रणनीती आणि चातुर्य यांचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. बुद्धिबळ हा फार जुना खेळ आहे. FIDE म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’म्हणून साजरा केला जातो.

20 जुलै : नसीरूद्धीन शाह जन्मदिन. 

नसीरुद्दीन शाह हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. वयाच्या 14 व्या वर्षापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. शेक्सपियरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे त्यांनी भूमिका केलेले पहिले नाटक होते. 

23 जुलै : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती 

बालगंगाधर टिळक म्हणजेच आपले स्थोर भारतीय नेते लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित होते. त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. यावर्षी त्यांची 167 वी जयंती आहे. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध धिकार आहे आणि तो मी मिळवणारच’असे ब्रीदवाक्य त्यांचे होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केले. त्यांच्या संघर्षमुळे देशाला स्वातंत्र मिळण्यांस खूप मोठे योगदान मिळाले.

26 जुलै : कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas)

1999 साली  भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात कारगिल युद्ध झाले होते, जे सुमारे 60 दिवस चालले आणि 26 जुलै रोजी संपले. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिलच्या युद्धात भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.   कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे.

27 जुलै : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन. 

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री होते.  

28 जुलै : World Hepatitis Day

हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. 

29 जुलै : अधिक श्रावण मास

यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. खरंतर वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना 354 दिवसांचा असतो. आणि सौर महिना 365 दिवसांचा असतो. दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक 33 दिवसांचा होतो, याला अधिक मास म्हणतात. यामुळे यंदा श्रावण दोन महिने चालणार आहे.

29 जुलै : मोहरम (ताजिया)

मुस्लिम बांधवांचा मोहरम हा मोठा सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे. या दिवशी विविध धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. मिरवणुका काढल्या जातात. 

29 जुलै : जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day)

जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे या दिवसाचं प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमीत कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात बचत होईल. म्हणूनच जागरूकता वाढवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व्याघ्रदिन साजरा केला जातो.

30 जुलै : International Friendship Day

संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. त्यानुसार 'जागतिक मैत्री दिन' साजरा केला जातो. 

महत्त्वाच्या बातम्या :

Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :16 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊतRaj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
×
Embed widget