एक्स्प्लोर
Advertisement
तात्काळ तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर, मुस्लीम समाजाकडून मोदी सरकारचं कौतुक
तत्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. आता हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. आता हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी राज्यसभेत मतदान पार पडले. यामध्ये विधेयकाच्या बाजूने 99 मतं पडली. तर विधेयकाच्या विरोधात 84 मतं होती. मतदानापूर्वी राज्यसभेत मोठी चर्चा झाली. यावेळी विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती.
विरोधकांच्या मागणीनंतर हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावे की पाठवले जाऊ नये, यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये 100 विरुद्ध 84 च्या मतफरकाने ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर विधेयकाच्या मंजुरीसाठी मतदान घेण्यात आले.
दरम्यान, सत्तारुढ एनडीएचे सहयोगी असलेल्या जदयू (जनता दल युनायटेड) आणि एआयडीएमके (अण्णाद्रमुक) पक्षाच्या प्रतिनिधींनी सभात्याग केला. त्यासोबतच टीआरएस, वायएसआर काँग्रेस आणि बसपा या पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील सभात्याग केला. तसेच विरोधी पक्षातले अनेक खासदार राज्यसभेत अनुपस्थित होते.
तिहेरी तलाकला पहिला विरोध 1970 साली, सय्यदभाईंशी खास बातचित | पुणे | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement