एक्स्प्लोर

Indira Gandhi: एक संधी मिळाली अन् इंदिरा गांधींनी 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले; नेमकं काय घडलं?

Indira Gandhi Birth Anniversary: युद्धविराम नाही तर आत्मसमर्पण करा असा आदेश भारताने पाकिस्तानला दिला आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आपले बिल्ले उतरवले. 

Indira Gandhi Birth Anniversary: देशातील शक्तिशाली आणि दृढ निश्चय असलेली व्यक्ती अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखले जाते. 1971 साली एक संधी चालून आली आणि त्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 एप्रिल 1971 साली एका इंदिरा गांधी यांनी भारताच्या लष्करप्रमुखांसोबत एक बैठक घेतली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जर युध्द करावे लागले तरी ते करावे, पुढच्या परिणामांची चिंता करु नये असा आदेश त्यांनी दिला. इंदिरा गांधींना हा असा आदेश द्यावा लागला होता कारण भारताच्या पूर्व भागातील पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये अशा काही घडामोडी घडत होत्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होत होता.

पाकिस्तानच्या लष्कराचा हैदोस 

पाकिस्तानच्या सरकारवर आणि लष्करावर पश्चिम पाकिस्तानच्या लोकांचे वर्चस्व होते. त्यांची भाषाही उर्दू होती. तर पूर्व पाकिस्तानच्या म्हणजे आताच्या बांगलादेशच्या लोकांची मातृभाषा ही बंगाली होती. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्करी अधिकारी पूर्व पाकिस्तानच्या लोकांचा द्वेष करायचे. 1970-71 च्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानच्या बहुमताला डावलून पश्चिम पाकिस्तानच्या लोकांनी सत्ता हस्तांतर करण्यास नकार दिला. यावर पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्याचाच सूड म्हणून पाकिस्तानच्या सरकारने आणि लष्कराने त्यांच्याच देशाचा भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला. पाकिस्तान लष्कराने या भागात आपल्याच लोकांविरोधात हिंसा सुरु केली. अनेक सामान्यांची हत्या केली. 

हे सर्व सुरु होते कारण त्या पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी लष्कराच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला होता. या लोकांचा आवाज दाबण्यासाठी लष्कराने हिंसेचा वापर केला. बघता बघता प्रचंड नरसंहार सुरु झाला. महिलांवर बलात्कार झाले, अनेक बालकांची हत्या झाली.

पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराच्या या अन्यायापासून वाचण्यासाठी पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी भारताच्या सीमेलगतच्या राज्यात आश्रय घ्यायाला सुरु केली. भारतात येणाऱ्या शरणार्थ्यांची ही संख्या वेगाने वाढू लागली. भारतीय पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी यांच्यावर शरणार्थ्य़ांच्या या प्रश्नावर काहीतरी पावले उचलावेत यासाठी दबाब वाढत होता. परिस्थितीचे भान लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी एका बाजूला लष्कराला तयार राहायला सांगितले आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाब टाकायला सुरुवात केली.

इंदिरा गांधींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न 

पाकिस्तानच्या या प्रश्नावर अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागार हेन्री किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इंदिरा गांधींनी त्यांना ठामपणे सांगितले की, जर अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. पूर्व पाकिस्तानचा प्रश्न ही पाकिस्तानची अंतर्गत गोष्ट आहे असं पाकिस्तान सातत्याने सांगत होता. पण इंदिरा गांधींनी साफ केले की हा प्रश्न पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न नाही. यामुळे भारतातील अनेक राज्यांची शांतता भंग होतेय.

इंदिरा गांधींनी एका बाजूने पाकिस्तानची डिप्लोमॅटिक स्तरावर नाकाबंदी करायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने जगभरात भारताच्या बाजूने मतप्रवाह कसा तयार होईल याची काळजी घेतली. पाकिस्तानच्या प्रश्नावरुन अमेरिकेची नरमाईची भूमिका लक्षात घेता इंदिरा गांधींनी 9 ऑगस्ट 1971 साली सोव्हिएत युनियनसोबत एक सुरक्षा करार केला. या करारात असे ठरवण्यात आले की भारत किंवा रशिया या दोन देशांपैकी कोणावरही एखाद्या देशाने आक्रमण केले तर त्याविरोधात दोन्ही देश मिळून कारवाई करतील.

मुक्ती वाहिनीचा जन्म 

पूर्व पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तिथे पोलिस, पॅरामिलिटरी फोर्स, ईस्ट बंगाल रेजिमेंट आणि पाकिस्तान रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात उठाव केला आणि स्वत:ला स्वतंत्र घोषित केले. या लोकांना भारताच्या मदतीची अपेक्षा होती. भारतीय लष्कराकडून या लोकांना आणि शरणार्थींना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आणि यातूनच मुक्ती वाहिनी सेनेचा जन्म झाला.

चीन आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तान भारताला सातत्याने आव्हान देण्याची भाषा करु लागला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानचे हवाई दलातील विमाने सातत्याने भारतीय सीमेवर घिरट्या घालू लागली होती. यावर भारताने पाकिस्तानला चेतावणी दिली. पण याचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांनी भारतावर 10 दिवसाच्या आत आक्रमण करण्याची धमकी दिली. यावेळी पाकिस्तानला ठाऊक नव्हते की इंदिरा गांधी अशाच संधीची वाट बघत आहेत.

युध्दाची घोषणा आणि ऑपरेशन ट्रायडंट 

इंदिरा गांधींचा निश्चय पक्का होता. प्रश्न हा होता की पहिला हल्ला कोण करणार. पाकिस्तानला भारताच्या तयारीचा अंदाज नव्हता. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या काही लष्करी विमानांनी भारतीय शहरांवर बॉम्ब हल्ला सुरु केला आणि हीच त्यांची मोठी चूक ठरली. या बातमीची माहिती मिळताच इंदिरा गांधी तडक मॅप रुममध्ये गेल्या. त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांनी नेमक्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते. सेनेच्या काही अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर इंदिरा गांधींनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. या सर्व वेगवान घडामोडीनंतर इंदिरा गांधीनी त्या रात्रीच ऑल इंडिया रेडिओवरुन देशाला संबोधित केले.

इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराला ढाकाकडे कूच करण्याचा आदेश दिला. त्याचवेळी भारतीय हवाई दलाने पश्चिम पाकिस्तानच्या महत्त्वाच्या ठिकांणावर बॉम्बचा वर्षाव सुरु केला. भारताच्या तीनही दलाने पाकिस्तानची मोठी नाकाबंदी केली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट सुरू केले. भारतीय नौसेनेने बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला होता. 5 डिसेंबरला भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करुन त्यांच्या नौसेनेच्या मुख्यालयाचे त्याचे प्रचंड नुकसान केले. आता पाकिस्तान भारताच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. या गोष्टीचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या निर्मितीला मान्यता देत असल्याची घोषणा केली.

याचा अर्थ असा होता की पूर्व पाकिस्तान हा आता पाकिस्तानचा हिस्सा राहिला नसून तो स्वतंत्र झाला आहे. भारताने युद्धातील विजयापूर्वीच ही घोषणा केली होती कारण युद्धविरामानंतर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात अडकून राहू नये. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या मदतीला तिकडे अमेरिकेने त्यांच्या नौसेनेचे सर्वात बलाढ्य सातवे आरमार बंगालच्या खाडीकडे पाठवले होते. याचा मुकाबला करण्यासाठी भारत-रशिया करारांतर्गत रशियाने त्यांची नौसेना हिंदी महासागराकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे दोन महासत्ता अप्रत्यक्षपणे एकमेकांसमोर आल्या होत्या.

युद्धबंदी नाही, आत्मसमर्पण करा, भारताचा आदेश 

अमेरिकेचे आरमार बंगालच्या खाडीत पोहचायच्या आधीच इंदिरा गांधींच्या आदेशाने लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांनी पाकिस्तानच्या लष्कराला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. पाकिस्तानसमोर त्यावेळी कोणताही पर्याय उरला नव्हता.

पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे कमांडर एएके नियाजी यांनी चीन आणि अमेरिकेच्या जीवावर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. पण तोपर्यंत भारतीय सेनेने ढाक्याला घेराव घातला होता. 14 डिसेंबरला भारतीय सेनेने ढाक्यातील गव्हर्नरच्या बंगल्यावर हल्ला केला. त्यावेळी तिथे गुप्त बैठकीसाठी पाकिस्तानच्या लष्कराचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. या घटनेने पाकिस्तानच्या लष्कराचा आत्मविश्वास डळमळीत झाला. जनरल नियाजींनी लागोलाग भारतीय लष्कराकडे युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला. पण भारतीय लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांनी आता युद्धविराम नाही तर आत्मसमर्पण करा असा आदेश पाकिस्तानला दिला.

पाकिस्तानचे आत्मसमर्पण 

पाकिस्तानच्या आत्मसमर्पणाची जबाबदारी भारताने मेजर जेकब यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मेजर जगजितसिंह अरोरा ढाक्यात पोहचले. अरोरा आणि नियाजी यांच्यात 16 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरु झाली.

पाकिस्तानचे लष्कर कमांडर नियाजींनी आत्मसमर्पणाच्या कागदावर सही केली आणि नंतर आपले लष्करी बिल्ले उतरवले. आत्मसमर्पणाच्या नियमांनुसार नियाजींनी त्यांचे रिव्ह़ॉल्वर अरोरांना दिले. पाकिस्तानच्या आत्मसमर्पणानंतर इंदिरा गांधींनी त्याची घोषणा केली. भारताने केवळ 14 दिवसात पाकिस्तानला गुडघ्यांवर आणले आणि अशा प्रकारे आपल्या धडाडीचा अनुभव जगाला दाखवत इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इंदिरा गांधींच्या या धडाडीमुळे जगाचा भूगोल बदलला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bala Nandgaonkar on Mahim : ..पण अजूनही वेळ गेलेली नाही, बाळा नांदगावकरांचं सर्वात मोठं वक्तव्य!Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तरUddhav Thackeray  Bag Check : मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅग तपासल्या, मविआचे नेते भडकलेABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 16 March 2023

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Embed widget