(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Bag Check : मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅग तपासल्या, मविआचे नेते भडकले
Uddhav Thackeray Bag Check : मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅग तपासल्या, मविआचे नेते भडकले
उद्धव_ठाकरे साहेबांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी प्रशासनाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीतून येणारे हेलीकॉप्टर आणि विमाने चेक केल्यास प्रशासनाच्या हाती निराशा लागणार नाही हे नक्की आहे. हे दळभद्री सरकार महाराष्ट्राच्या युवांना रोजगार तर देऊ शकलं नाही, परंतु हेलीकॉप्टर चेक करण्याच्या निमित्ताने मध्यप्रदेशच्या कॅमेरामॅनला मात्र रोजगार देत आहे, याचा आनंद आहे.
हे ही वाचा..
उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? त्यांनी इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे. मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडीओ मला आला पाहिजे. तिथे तुम्ही शेपूट घालू नका. हा व्हिडीओ मी रिलीज करत आहे. माझं युरीन पॉट पण तपासा.