एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार

महिला तुमच्या नोकर नाहीत, अशा प्रकारे मातांचा अवमान करतील तर तुमच्या पेटकात लाथ द्यायची नाही तर काय घालायचं अशी विचारणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : पैसे येथून घ्यायचा आणि तिकडे सभेला जायचं म्हणतो, मुन्ना काय तुझ्या बापाचे पैसे देतोस का? बापाचा पैसा वाटतोस का? महिला तुमच्या नोकर नाहीत, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर घणाघाती प्रहार केला. खासदार धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रचारात बोलताना लाडक्या बहिणींना पैशावरून जाहीपणे धमकावल्यानंतर सडकून टीका होत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महाडिक यांच्यावर सडकून टीका केली. वाशिममध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांच्यावरती कडाडून प्रहार केला. 

हात लावल्यास हात खेचून टाकीन

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोल्हापूरचा मुन्ना मुद्दामपणे सांगतोय, पण तुमच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणाची नाही. हात लावल्यास हात खेचून टाकीन, असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. मस्तवालपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा. महिला तुमच्या नोकर नाहीत, अशा प्रकारे मातांचा अवमान करतील तर तुमच्या पेटकात लाथ द्यायची नाही तर काय घालायचं अशी विचारणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. ते म्हणाले की महाराष्ट्र स्वावलंबी हवा की नको याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मोदी शाह महाराष्ट्राचा आधार तोडण्यासाठी चालले आहेत. मात्र, आधार तुटण्यामध्ये जर मध्ये कोणी उभा राहत असेल तर ती फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि हा उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा राहू शकतो. तुम्ही माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, मात्र तुम्हाला बाळासाहेबांची स्तुती करावी लागते अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्याकडे यांच्यावर तोफ डागली. तुम्ही महाराष्ट्राकडे तुम्ही मतांची भीक मागत असल्याची टीका सुद्धा ठाकरे यांनी केली. कोणत्या तोंडाने मते मागत आहात? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. आपण मात्र उभे आहोत, पाहूयात कोणाची हिंमत होते महाराष्ट्र तोडण्याची अशा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिला.  

स्वतः ला काय समजता? अदृश्य शक्ती? सुप्रिया सुळेंचाही हल्लाबोल

दरम्यान, महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, भाजपची संस्कृती आहे. सातत्याने महिलांचा अपमान करतात, धमकी देत आहेत. नगरमध्ये बाळासाहेबांच्या लेकीला गलिच्छ भाषा वापरली, धमकी दिली. आता पुन्हा महाडिक यांनी धमकी दिली. हे स्वतः ला काय समजतात?, अदृश्य शक्ती? अदृष्य शक्ती मागे आहे म्हणून काहीही करतील का? गलिच्छ विधान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहू. महिला पाहिजे तिथं जातील. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करून दाखवा. गाठ या सुप्रिया सुळेंशी असेल. प्रत्येक महिलेच्या पुढे ढाल म्हणून राहील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.  

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget