(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Long Range Bomb : लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बची चाचणी यशस्वी, भारताच्या लष्करी क्षमतेत वाढ
Long Range Bomb : भारताने शुक्रवारी दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. यामुळे भारताच्या सीमापार करण्यात येणाऱ्या हल्ल्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे.
Long Range Bomb : भारताने शुक्रवारी दीर्घ पल्ल्याचा वेध घेणाऱ्या बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. या बॉम्बची निर्मीती डीआरडीओने (DRDO) आणि भारतीय हवाई दलाने एका एरियल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केली आहे. या चाचणीमुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेत चांगलीच वाढ झाली असून सीमेच्या पलिकडे असलेल्या लक्ष्यालाही भेदता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारताने आपल्या लष्करी क्षमतांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य दिलं आहे. एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीनचे आव्हान असल्याने भारतीय लष्कर जास्तीत जास्त अत्याधुनिक शस्त्रांची निर्मीती करण्यावर भर देत आहे. बुधवारी भारताने अग्नी 5 या मिसाईलची यसस्वी चाचणी घेतली होती. ओडिशामधील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
अग्नी 5 हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) या प्रकारातील आहे. याची निर्मिती डीआरडीओने (DRDO) केली आहे. भारताने या मिसाईलच्या निर्मितीची सुरुवात 2008 साली केली होती. त्यानंतर आतापर्यंत याची सात वेळा परीक्षण घेण्यात आलं आहे. या मिसाईलच्या माध्यमातून न्युक्लियर वेपन्स कॅरी करता येऊ शकतात. हे मिसाईल सहजपणे वाहून नेता येऊ शकतं.
अग्नी 5 या मिसाईलचा वेग हा 24 मॅक इतका असून तो आवाजाच्या वेगाच्या 24 पट हा वेग असल्याचं सांगितलं जातं. अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा पल्ला हा पाच हजार किलोमीटर इतका आहे. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील अनेक देश या मिसाईलच्या टप्प्यात येणार असल्याने भारताच्या लष्करी शक्तीत चांगलीच वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :