(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Underwater Metro : भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावणार मेट्रो; कोलकाता मेट्रोकडून लवकरच अंडरवॉटर मेट्रोची चाचणी होणार
Underwater Metro : भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून मेट्रो धावणार आहे. कोलकाता मेट्रोकडून लवकरच अंडरवॉटर मेट्रोची चाचणी होणार आहे. खरंतर 9 एप्रिलला अंडरवॉटर मेट्रोची चाचणी करण्यात येणार होती. पण ती रद्द करण्यात आली.
Underwater Metro Train in India : देशभरात सगळीकडे मेट्रोचं जाळं पसरत आहेत. त्यातच कोलकातामध्ये अंडरवॉटर मेट्रोची चाचणी केली जाणार होती. परंतु ही चाचणी अनपेक्षितपणे रद्द करण्यात आली. लवकरच ही चाचणी पूर्ण करण्यात येणार असल्याचं कोलकता मेट्रो कॉर्पोरेशने सांगितले आहे.
भारतात अंडरवॉटर मेट्रो सुरु करण्याचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. यासाठी कोलकात्यामध्ये हुगळी नदीच्या खाली एक बोगदा बांधण्यात आला आहे. हावडा मैदान आणि सॉल्ट लेकमधील सेक्टर व्हीला जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम मेट्रो मार्गासाठी हुगळी नदीच्या खाली दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (KMRC) रविवारी 9 एप्रिल 2023 रोजी या मार्गाच्या एका भागावर चाचणी चालवण्याची योजना आखली होती. परंतु ती रद्द करण्यात आली. मात्र, लवकरच ही चाचणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे कोलकता मेट्रो कॉर्पोरेशने सांगितले आहे. या चाचणीचा एक भाग म्हणून दोन ते सहा डबे असलेली ही मेट्रो एस्प्लेनेड आणि हावडा मैदानादरम्यान 4.8 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.
देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोसाठी डिसेंबर अखेरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. या मेट्रोच्या चाचणीसाठी आधी काही मार्गिका निश्चित करण्यात आल्या आहेत. यानुसार, साल्ट लेक आणि हावडा ग्राऊंडच्या दरम्यान ट्रेन चालवली जाणार होती. यादरम्यान सियालदह आणि एस्प्लेनेड बोगद्यातून मेट्रोची टेस्टिंग करण्यात येणार होती. या बोगद्याच्या रुळाचं काम प्रगतीपथावर असून ते अजून पूर्ण झालेले नाही. हे लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात ट्रॅक टाकण्यात आले होते पण ट्रायल रनसाठी मार्ग पूर्ण तयार होऊ शकला नाही. त्यामुळे या मार्गिकेवरील रविवारी 9 एप्रिल 2023 रोजी होणारे ट्रायल रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील चाचणीच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
विशेष म्हणजे 1984 मध्ये देशातील पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोलकात्यात झाले आणि 2002 मध्ये दिल्लीने मेट्रो सेवा देण्यास सुरुवात केली होती. आता लंडन आणि पॅरिसच्या धर्तीवर लवकरच भारताला अंडरवॉटर मेट्रो (underwater metro train) मिळणार आहे. ही भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो (India's first underwater metro) असणार आहे. यासाठी लवकरच नव्याने मेट्रोच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे.
अंडरवॉटर मेट्रोमुळे लोकांना पाण्याखाली मालदीवसारखा अनुभव मिळणार आहे. या मेट्रोला 6 डब्बे जोडलेले असतील. याशिवाय ही मेट्रोमध्ये इतर बऱ्याच बाबतीत खास असणार आहे कोलकता ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रकल्पानुसार( kolkata metro east-west corridor) या मेट्रोची 9 एप्रिलला चाचणी करण्या टेस्टिंग करण्यात आली आहे. ही मेट्रो एस्प्लेनेड आणि हावडा ग्राऊंडच्या दरम्यान 4.8 किलोमीटरच्या अंतराचे ट्रायल रन करणार असल्याचे समजते.
कोलकत्यातून धावली देशातील पहिली ट्रेन
1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो ट्रेन कोलकात्यामध्ये सुरु करण्यात आली होती. यानंतर 2002 मध्ये राजधानी दिल्ली येथे दुसरी मेट्रो सुरु करण्यात आली होती. आता अनेक शहरांत या मेट्रो सुसाट धावताना सहज पाहायला मिळत आहेत. पण कोलकाता अंडरवॉटर मेट्रोची जोड मिळणार आहे. याआधी महाराष्ट्राने सत्तरच्या दशकात मेट्रो प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. या मेट्रो प्रकल्पाचा पूर्ण रोडमॅप तयार करुनही अनेक वर्षे प्रकल्प रखडला होता. मात्र, यानंतर 1984 मध्ये पहिली मेट्रो कोलकता शहरातून सुरू झाली. यामुळे देशातील पहिली मेट्रो आणि पहिली अंडरवॉटर मेट्रो सुरु करण्याचा मान कोलकता शहराला मिळणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच कोलकता हे शहर आधुनिकीकरणाच्या बाबतीत अग्रेसर शहर आहे.
या मेट्रोमुळे होणार वेळेची बचत
दरम्यान, ही अंडर वॉटर मेट्रो ताशी 80 किलो मीटरच्या वेगाने धावणार आहे. हुगळी नदीखालून या मेट्रोच्या प्रवासाला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणार असल्याचे समजते. या मेट्रोसाठी तयार करण्यात आलेला लोहमार्ग जवळपास 16 किलोमीटरचे इतक्या अंतराचा असणार आहे. यामध्ये 10.8 किलोमीटरचे अंतर अंडरवॉटर असणार आहे. कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एस्प्लानेड स्थानकाला हावडा आणि सियालदह येथील रेल्वे स्थानकांसोबत जोडण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्टे आहे.
आणखी किती काळ वाट पाहावी लागणार?
भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा देशातील पहिला अंडर वॉटर मेट्रो सेवा देणारा ईस्ट-वेस्ट मेट्रो कॉरिडोर प्रकल्प असणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्पाचे आणखीन बरेच काम पूर्ण करायचे आहे. यासाठी बराच काळ जाऊ शकतो. असे कोलकता मेट्रो कॉर्पोरेशने म्हणणे आहे. त्यामुळे पहिल्या अंडरवॉटर मेट्रोची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या सर्वांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे या प्रकल्पाल जवळपास 6 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकल्पाला येणारा अंदाजित किती खर्च?
कोलकतामधील हावडा स्टेशन सर्वात जास्त 33 मीटरपर्यंत खोल राहिल. सध्या हौज खास हे स्टेशन 29 मीटर खोल असून सर्वात खोल स्टेशन आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या बोगद्याला बनवण्यासाठी प्रति किलोमीटर 120 कोटी रुपयांपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे. ही मेट्रो हुगळी नदीच्या 13 मीटर खोल तळाच्या खालून जाणार असल्याचे समजतं. त्यामुळे लोकांना पाण्याखाली प्रवास करताना मालदीवचा फील येणार आहे. हे मात्र नक्की आहे. भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रोची टेस्टिंग कोलकत्यात काही दिवसांतच प्रत्यक्षात येताना दिसू शकते. हुगळी नदीतून ही टेस्ट होणार असून कोलकत्ता पूर्व-पश्चिम मेट्रो मार्गासाठी दोन पाण्याखालील बोगदे बांधण्यात आले आहेत. या मार्गावरील मेट्रो ट्रेनची टेस्टिंग नुकतीच रद्द करण्यात आली होती. परंतु, या मेट्रोच्या टेस्टिंचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे कोलकता मेट्रो ट्रेन कॉर्पोरेशनकडून (KMRC)असे आश्वासन दिले आहे.