एक्स्प्लोर
Advertisement
भारतानं डोळे वटारल्यानंतर पाक गांगरलं, पाक डीजीएमओचा भारताला फोन
नवी दिल्ली : शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर, पाकिस्तानने आता शांती प्रस्ताव पुढं केला आहे. भारत-पाक सिमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन (DGMO) चे प्रमुख मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल ए.के. भट्ट यांच्याशी संपर्क साधला.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या आग्रहावर दोन्ही देशांमध्ये DGMO स्तरावर सोमवारी सकाळी 10.30 मिनिटांनी फोनवरुन चर्चा झाली. ही चर्चा भारत-पाक सिमेवरील तणावाच्या परिस्थितीवर झाली.
यावर भारताचे DGMO लेफ्टनेंट जनरल ए.के.भट्ट यांनी भारत शांततेसाठी वचनबद्ध असल्याचं मिर्झा यांना सांगितलं. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सिमेवर अशांतता निर्माण झाल्याचंही, त्यांनी यावेळी सुनावलं.
भट्ट म्हणाले की, ''जर पाकिस्तानच्या लष्करानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अन् त्यासाठी क्रॉस फायरिंग केलं. तर भारतीय जवान त्याला चोख प्रत्युत्तर देतील.''
यावर पाकिस्तानकडून स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा उठवला गेला. त्यावरुनही भट्ट यांनी पाकिस्तानच्या DGMO ना चांगलच सुनावलं. भारतीय लष्कराची जगात ख्याती आहे. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना हानी पोहचवत नाहीत.
गेल्या महिन्याभरापासून भारत-पाक सिमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. 2 मे रोजी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सने भारतीय हद्दीत घुसखोरी करुन, हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. विशेष म्हणजे, यावेळी पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सने त्या दोन्ही शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही केली.
या घटनेनंतर भारत-पाक सिमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय जवान पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
संबंधित बातम्या
काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, चार दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर हल्ला, एक जवान शहीद, 5 जखमी
मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही : लष्करप्रमुख
जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार
VIDEO : दगडफेक रोखण्यासाठी जवानांनी काश्मिरी तरुणाला जीपवर बांधलं!
जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली
श्रीनगरमध्ये फुटीरतावाद्यांचं CRPF जवानांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
एका थप्पडच्या बदल्यात 100 जिहादींना ठार करा : गंभीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement