एक्स्प्लोर

लॉकडाऊनमध्येही देशात विशेष ट्रेन; 1200 मजुरांना घेऊन पहिली ट्रेन रांचीत दाखल

देशात 40 दिवसांनंतर शुक्रवारी पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन झारखंडमधील हटिया येथे पोहोचली.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक लवकरच स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून शुक्रवारपासून देशभरात विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यातील काही ट्रेन धावल्या आहेत तर काही ट्रेन येत्या काही दिवसांत धावणार आहेत. लवकरच ज्या लोकांना आपल्या राज्यात परतण्याची इच्छा आहे अशांसाठी देखील परतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

देशात 40 दिवसांनंतर शुक्रवारी पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन झारखंडमधील हतिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन या वेळी करण्यात आलं. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.

देशात काल कामगारांना घेऊन जाण्यासाठी या ट्रेन धावणार

  • तेलंगणा ते झारखंड
  • महाराष्ट्रातील नाशिक ते भोपाळ
  • राजस्थानमधील जयपूर ते बिहारमधील पाटणा
  • झारखंडची रांची ते राजस्थानची कोटा
  • केरळमधील अलुवा ते ओडिशामधील भुवनेश्वर पर्यंत

दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

स्वगृही पाठवताना काय काळजी घेतली जाणार?

प्रत्येक राज्याने प्रवाशांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
ED Actions: मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
Delhi SIR Protest: दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
Saurav Das, Ashutosh Ranka: दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
Embed widget