भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास कोचचे रुपांतर करणार जनरल कोचमध्ये
रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत: दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हा प्लॅन लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रत्येक वर्गानुसार प्रवासात सुविधा पुरवते. जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी ते डब्यापर्यंत प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात. मात्र जनरल डब्यातील प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने 21 ऑगस्ट रोजी दिले आहेत. विशेषत: दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हा प्लॅन लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ट्रेनमधील स्लीपर कोचमधील प्रवाशांची संख्या असल्यास त्या कोचचे जनरल कोचमध्ये बदलण्याची शिफारस करण्यात येणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळावा आणि लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळाव्यात हा आहे. रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत ट्रेन सुटत नाही तोपर्यंत जनरल कोचचे तिकिट दिले जाते. जनरल कोचच्या तिकिटासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळ जनरल कोचमध्ये कायम गर्दी पाहायला मिळते. रेल्वेच्या प्रत्येक कोचची क्षमता आहे.
रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 18 ते 24 जणांना, सेकंड क्लास एसी मध्ये 48 ते 54, थर्ड एसीमध्ये 64 ते 72, स्लीपरमध्ये 72 ते 80 आणि जनरल कोचमध्ये 90 जणांना प्रवास करण्याची सुविधा असते. मात्र जनरल कोचमध्ये 180 हून अधिक प्रवासी प्रवास करतात. जनरल कोचमधील वाढत्या गर्दीचे कारण थ्री टायर एसी कोचची संख्या हे देखील आहे. रेल्वेने जास्त फायदा मिळवण्यासाठी थ्री टायर एसी कोचची संख्या वाढवली आहे. जनरल कोचच्या तुलनेत थ्री टायर एसी कोचमधून रेल्वेला जास्त महसूल मिळतो.
दरम्यान बालासोर येथील अपघातानंतर रेल्वेने अनआराक्षित कोच बाहेर देखील पिण्याचे पाणी, नाश्त्याची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सफाई करण्यासंदर्भत देखील सूचना दिल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास आरमदायी आणि सुखकर करण्यासठी भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान कोरोना काळात जनरल कोचमध्ये देखील रिझर्व्ह सीट दिले जात होते. जनरल डब्याला सेकंड सिटिंग करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी जनरल कोचचे मर्यादित तिकिट दिले जाक होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा तिकिटे कोचच्या क्षमतेपेक्षा जास्त वाटण्यात सुररवात झाली आहे.
हे ही वाचा :