एक्स्प्लोर
भारताच्या हल्ल्यात उरीजवळ पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त
उरी सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे.
श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानाला पुन्हा एकदा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काल मेंढर सेक्टरमध्ये हल्ला केल्यानंतर आता भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. उरी सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे.
22 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय सैनिकांनी ही कारवाई केली. यात पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने 250 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
भारतीय सैनिकांच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानने सीमेवर रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या 51 दिवसात भारताने केलेल्या कारवाईत 22 सैनिकांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
भारताने काल मेंढर सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडीओ जारी केला होता.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement