Army New Combat Uniform : लष्करप्रमुख मनोज नरवणे नवीन लढाऊ गणवेशात, लष्कर दिनानिमित्त जवानांना नव्या गणवेशाची भेट
74 व्या लष्कर दिनानिमित्त जवानांना नवीन गणवेशाची भेट मिळाली आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी नुकतीच इस्टर्न आर्मी कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी लष्कराचा नवीन लढाऊ गणवेश परिधान केला.
Army New Combat Uniform : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी नुकतीच इस्टर्न आर्मी कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी लष्कराचा नवीन लढाऊ गणवेश परिधान केला. इस्टर्न आर्मी कमांड जेथे नरवणे यांनी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला.
74 व्या लष्कर दिनानिमित्त जवानांना नवीन गणवेशाची भेट मिळाली आहे. या गणवेशाला लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी 15 विशेष कॅमफ्लाज पॅटर्न, चार वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आणि 8 प्रकारच्या फॅब्रिक्सची तपासणी केल्यानंतर मान्यता दिली. भारतीय लष्कराचा हा नवीन गणवेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने जवानांना या नवीन गणवेशाचे वाटप केले जाणार आहे.
Indian Army Chief General Manoj Mukund Naravane wears the new combat uniform during a recent visit to the Eastern Command area where he reviewed the operational preparedness pic.twitter.com/9zMeGDsaz8
— ANI (@ANI) January 19, 2022
जवानांच्या या नवीन गणवेशात डिजिटल कॅमफ्लाज पॅटर्न आहे. युनिफॉर्मचे फॅब्रिक खूप हलके असून ते खूप लवकर सुकते. नवीन गणवेश 13 वेगवेगळ्या आकारात तयार करण्यात आला आहे. युद्धादरम्यान या गणवेशातील सैनिकांना ऑपरेशनसाठी मदत होईल.
भारतीय लष्कराचा सध्याचा गणवेश 2008 पासून वापरात होता. हा गणवेश बाजारातही उपलब्ध होता. त्यामुळे तो सर्वसामान्य नागरिकही वापरत होते. जुन्या गणवेशाच्या तुलनेत नवीन गणवेशातील मुख्य बदल म्हणजे कॅमफ्लाज पॅटर्न, डिझाइन आणि नवीन सामग्रीच्या वापराबाबत आहेत. नवीन युनिक कॅमफ्लाज पॅटर्नमध्ये ऑलिव्ह ग्रीन आणि मातीच्या छटांचा समावेश आहे. वाळवंटापासून ते उच्च प्रदेश, जंगले आणि मैदानी प्रदेशांपर्यंत सैनिक काम करतात त्या परिस्थितीची विस्तृत श्रेणी लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज': लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे
भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी