एक्स्प्लोर

'LAC वर स्थिती तणावपूर्ण, मात्र आपलं सैन्य सज्ज': लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेतला

लडाख : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन दिवस लडाखचा दौरा केल्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी म्हटलं आहे की, 'LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे', असं ते म्हणाले. गुरुवारपासून लडाख दौऱ्यावर आहेत लष्करप्रमुख

भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. काल, गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेतला. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी  बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.

India-China Border Faceoff: तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर, सीमेवरील तयारीचा आढावा भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं- जनरल रावत चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनशी आपल्याकडून धोका असल्याचं बघून पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, असं जनरल रावत म्हणाले. जनरल रावत म्हणाले की, चीन ज्या पद्धतीनं रणनीतीनुसार आर्थिक आणि धोरणात्मक मदत पाकला करतंय हे पाहता आपल्याला मोठ्या प्रमाणावर तयारीत राहायला हवं.  सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, जर त्यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. असं त्यांनी म्हटलंय.

भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी 

भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष  भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

काय म्हणाले होते चीनचे परराष्ट्र मंत्री युरोप दौऱ्यावर असणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं. वांग यी म्हटले होतं की, भारत-चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सीमांची आखणी झाली नसल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यापुढेही वाद सुरूच राहतील. पण चीन भारताशी असलेल्या सर्व वादांच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढायला तयार आहे. त्यांनी हे वक्तव्य सोमवारी पॅरीसमधील ' फ्रेंच इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ' या संस्थेतील एका कार्यक्रमात केले.

भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष  वांग यी यांनी पुढे म्हटलं होतं की, भारत-चीन संघर्षाकडे जगाचं लक्ष आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत कोणत्याही अधिकृत सीमांची आखणी झालेली नाही. त्यामुळं हे अशा प्रकारचे वाद भविष्यातही होत राहतील. परंतु चीनची भारतासोबत कोणत्याही वादावर चर्चेची तयारी आहे. याआधीही चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्यात दोन देशांत असलेले मतभेद बाजूला ठेवून द्विपक्षीय सहकार्यावर अधिक भर देण्याचेही ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India Song In Pakistan : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget