DRDO : घातक पाणबुड्या नष्ट करण्याची क्षमता, SMART मुळे नौदलाची ताकद वाढली
SMART Launch News : घातक पाणबुड्याला नष्ट करण्याची क्षमता असणारी मिसायल ओदिशामधील बालासमोर येथे लाँच करण्यात आली. या मिसाइलमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.
SMART Launch News : घातक पाणबुड्याला नष्ट करण्याची क्षमता असणारी मिसायल ओदिशामधील बालासमोर येथे लाँच करण्यात आली. या मिसाइलमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. सोमवारी भारताने ओदिशामधील बालासोर येथे लांब मारक क्षमता असणारे सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉरपीडो (SMART) याला यशस्वीपणे लाँच केलं. स्मार्ट मिसाइल लाँच झाल्यानंतर डीआरडीओने सांगितलं की, ' घातक पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढविण्यासाठी ही मिसाइल खास तयार करण्यात आली आहे. जी पारंपारिक टॉरपीडोच्या रेंजपेक्षा जास्त क्षमता असणारी आहे. ही अशी सिस्टम आहे, ज्यामध्ये टॉरपीडोसोबत मिसाइलही असते. '
स्मार्टच्या (SMART) चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व क्षमतांचं प्रात्यक्षिक पाहण्यात आले आहे. यामध्ये स्मार्ट यशस्वी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. स्मार्ट ही पुढील पिढीतील प्रगत क्षेपणास्त्रावर आधारित टॉरपीडो डिलीव्हरी प्रणाली आहे, असे डीआरडीओने सांगितले. लवकरच स्मार्ट नौदलात दाखल होणार आहे. भारताकडे याआधीच वरुणास्त्र नावाचे पाणबुडीविरोधी टॉरपीडो आहे. हे टॉरपीडो जीपीएसच्या मदतीने लक्ष्यावर मारा करू शकते. वरुणास्त्रच्या तुलनेत स्मार्ट वजनाने खूपच हलकं आहे.
स्मार्ट एकप्रकारचे अँटी-शिप क्षेपणास्त्र आहे. यामध्ये कमी वजनाचा टॉरपीडो बसवलेला असतो, जो पेलोड म्हणून वापरला जातो. या दोघांची ताकद मिळून सुपरसॉनिक अँटी-सबमरीन क्षेपणास्त्र तयार होते. त्यानंतर याला क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये देखील असतील आणि पाणबुडी नष्ट करण्याची क्षमताही मिळेल. स्मार्टची मारक क्षमता तब्बल 650 किमी इतकी असेल. 650 किमी पर्यंत मारक क्षमता असलेली प्रणाली आपल्याकडे असल्याने आता भारतीय नौदल जगातील सर्वात शक्तीशाली नौदलाच्या यादीत स्थानही मिळणार आहे.
#WATCH | India today successfully carried out a long-range Supersonic Missile Assisted Torpedo (SMART) off coast of Balasore in Odisha.
— ANI (@ANI) December 13, 2021
"The system has been designed to enhance Anti-sub marine warfare capability far beyond the conventional range of the torpedo," DRDO says pic.twitter.com/ZhD34UwuFW
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबंधित बातम्या